Fellow story – Nidhi Wasnik 
Fellow story – Nidhi Wasnik 

Fellow story – Nidhi Wasnik 

मी निधी वासनिक. मूळची नागपूर जिल्ह्यातील. माझं पद्व्यूत्तर शिक्षण MSW मध्ये चालू आहे. मी Learning Companions Fellowship २०२२-२४ कोहार्ट ची fellow आहे. सध्या  ‘PAHAL Day Boarding Center (An initiative by UPAY) वर्धमान नगर’ येथे ५ ते १२ वयोगटातील मुलांना शिकवते.

Graduation झाल्यानंतर माझ्या मैत्रिणीकडून Learning Companions Fellowship बद्दल मला कळले. मुलांना शिकवायला मिळणार म्हणुन मी देखील Fellowship ला apply केले. दोन ते तीन महिन्यांच्या निवड प्रक्रियेला सामोरे गेल्यानंतर Fellowship ला निवड झाली. आणि Learning Companions सोबतचा माझा प्रवास सुरु झाला.

Learning Companions Fellowship माझ्या आयुष्याला एक वेगळं वळण देत आहे. Learning Companions fellowship ला आल्या नंतर मला स्व:ताला काय आवडते, मला कशातून आनंद मिळतो आणि माझे भविष्य काय असेल हे बघता येत आहे. माझे बालपण पुन्हा नव्याने जगायचे होते. अशा सगळ्या गोष्टी ज्या माझ्या बालपणात राहून गेल्या त्या सगळ्या गोष्टींनी भरलेलं आणखी एक आयुष्य मुलांसोबत मला जगायला मिळत आहे.

वर्धमान नगरला फुटपाथ वर राहत असलेल्या समुदायासोबत काम करताना त्यांच्या समस्या, अडचणी , अशिक्षितपणा , त्यामागील कारणे या सगळ्या गोष्टी त्यांच्यासोबत राहून, दररोजच्या चर्चेतून मला चांगल्याने समजून घेता येत आहेत. शिक्षणाच्या माध्यमातून लहान मुलांच्या मनावर संस्कार करता येत.ही बाब माझ्या फूटपाथच्या मुलांमध्ये रुजविणे म्हणजे मुलांसाठी नवीन विश्व निर्माण करण्यासारखे आहे. ते विश्व कायमस्वरूपी Learning Companions fellowship प्रवासादरम्यान माझ्या मनावर रेखाटले जात आहे. ज्यामधून मला खूप आनंद मिळत आहे.या संपूर्ण Fellowship मध्ये मी एक leader, administration, trainer, coordinator  सारख्या जबाबदाऱ्या स्वतः पार पडायला शिकत आहे. मुलांना शिकविण्यापासून ते documentation पर्यंतचे कौशल्य मला शिकायला मिळत आहे. ही सगळी छोटी – छोटी कौशल्य माझ्या भविष्याला आणखी खंबीर बनविण्यास मला मदत करत आहे. Learning Companions Fellowship चा प्रवास मला माझ्या भविष्यातील स्वप्नाच्या आणखी जवळ नेत आहे. 

या वर्षी फेलोशिपचा भाग होण्यासाठी आजच रजिस्टर करा आणि आमच्या फेसबुक इंस्टाग्राम page ला subscribe करा! लवकरच तुम्हाला पुढील तपशील page वर मिळतील!

https://forms.gle/NGhn7Enw8XvEPVyd7

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *