Learning Companions Fellowship 2023

Learning Companions Fellowship 2023

A turn for everyone

Learning Companions Fellowship 2023-25

फेलोशिप बद्दल 

(कृपया याची नोंद घ्यावी की ही फेलोशिप केवळ नागपूर आणि आसपास च्या जिल्ह्यातील युवांसाठी आहे)

तुम्हाला फेलोशिप बद्दल अधिक जाणून घ्यायचे असल्यास हा फॉर्म भरून पाठवा – फेलोशिप नोंदणी फॉर्म

मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आपल्या आजूबाजूची सध्याची शिक्षणाची स्थिती माहितच आहे. फक्त लिहिणे, वाचणे, दहावी, बारावी, ग्रॅज्युएशन पूर्ण करणे याच्याने चांगल्या कामाच्या संधी मिळत नाहीत किंवा स्वतः काही करण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि ज्ञान मिळत नाही. ही परिस्थिती बदलणे आज अत्यंत गरजेचे आहे.

सुदैवाने आता ही परिस्थिती बदलत आहे. कोणत्या प्रकारे शिकवल्यामुळे मुलांना शिक्षणाची गोडी लागेल, मुलांना प्रत्यक्ष जीवनात उपयोगी कौशल्ये मिळतील, वेगवेगळ्या संधींची माहिती मिळेल याविषयी खूप चांगले काम जगभरात सध्या चालू आहे. अशाच प्रकारचा एक चांगल्या शिक्षणाचा प्रयोग आम्ही नागपूर जिल्ह्यात करत आहोत. यामध्ये काम करण्यासाठी आम्हाला अशा युवांची गरज आहे ज्यांना मुलांसोबत रहायला, खेळायला, मुलांना शिकवायला आवडते. अशा युवांना प्रत्यक्ष काम करता-करता शिकणे आणि शिकवण्याच्या पद्धती विषयी उच्च गुणवत्तेचे प्रशिक्षण देऊन नागपूर जिल्ह्यात चांगल्या शिक्षणाची एक चळवळ आम्ही उभी करणार आहोत. 

ही दोन वर्षाची पूर्णवेळ (full-time) काम आणि प्रशिक्षणाची संधी आहे. यामध्ये फेलोशिपच्या काळात दोन वर्ष तुम्हाला निर्वाहासाठी योग्य मानधन मिळेल आणि तुम्ही मेहनतीने तयार झालात तर पुढे शिक्षणाच्या क्षेत्रात चांगल्या कामाच्या संधी मिळतील.

तुम्हाला मुले आवडतात का? तुम्हाला अशा प्रकारचे प्रशिक्षण घेऊन मुलांना शिकवायला आवडेल का? तुम्हाला याचा भाग व्हायला आवडेल का? 

तुम्हाला काय करायला मिळेल?

फेलोशिप च्या काळात आपल्याला मुलांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देता यावे आणि तुमचे शिक्षक म्हणून खूप चांगले प्रशिक्षण व्हावे यासाठी तुम्हाला खालील कामे करावी लागतील. यासाठी आवश्यक कौशल्ये आणि माहिती तुम्हाला आधीच असली पाहिजे याची गरज नाही. तुम्हाला यातील प्रत्येक गोष्टीचे प्रशिक्षण आणि वेळोवेळी मदत मिळेल. फक्त तुम्हाला नवीन गोष्टी शिकण्याची आवड आणि तयारी असणे हे सर्वात महत्वपूर्ण आहे. 

  1. सर्व प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करणे, शिक्षणासाठी आवश्यक अभ्यास आणि कामे वेळेवर आणि आवडीने पूर्ण करणे 
  2. तुम्हाला नेमून दिलेल्या वर्गाला शाळेच्या वेळापत्रकाप्रमाणे नियमित शिकविणे 
  3. मुलांच्या शिक्षणाविषयी जागृती निर्माण व्हावी आणि मुलांच्या शिक्षणातील पालकांचा सहभाग वाढावा यासाठी नियमितपणे पालकांच्या घरी भेटी देणे, गावामध्ये वेगवेगळे कार्यक्रम घेणे, पालकसभा घेणे 
  4. मुलांना शिकवण्यासाठी तुम्हाला दिले गेलेल्या साधने आणि प्रशिक्षण याच्या मदतीने चांगल्या पद्धतीने वर्ग, पाठाची तयारी करणे 
  5. सर्व कामांचे नियोजन तसेच कामाबद्दल रिपोर्टींग यासाठी आवश्यक माहिती गोळा करणे, फॉर्म भरणे, कंप्युटर वर माहिती भरणे इ. 

पात्रता – तुम्हाला फेलोशिप साठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे काय असले पाहिजे 

  1. मुलांसोबत राहण्याची आणि मुलांना शिकवण्याची आवड 
  2. नवीन गोष्टी शिकण्याची आणि खूप जास्त मेहनत करण्याची तयारी 
  3. ४ थी वर्गापर्यंतच्या मुलांना शिकवता येईल इतके भाषा आणि गणिताचे कौशल्य 
  4. कंप्युटर वापरा बद्दल बेसिक समज किंवा शिकण्याची तयारी 
  5. प्रशिक्षणासाठी आवश्यक तेव्हा प्रवास करणे आणि बाहेर राहण्याची तयारी
  6. वय मर्यादा – २० ते २७
  7. विवाहित युवतींना विशेष प्राधान्य – तुम्हाला तुमच्याच गावाजवळ असलेल्या एखाद्या ठिकाणी शिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळेल
  8. दोन वर्षासाठी पूर्ण वेळ (full-time) काम करण्याची तयारी 

तुम्हाला फेलोशिप मध्ये सहभागी का झाले पाहिजे 

  1. तुम्हाला मुलांना शिकवण्याची आवड असेल तर इथे तुम्हाला दोन वर्षात अतिशय उच्च गुणवत्तेचे प्रशिक्षण मिळेल 
  2. शिक्षणासोबत तुम्हाला संवाद, नेतृत्व क्षमता, व्यवस्थापन आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित इतर कौशल्यांचे प्रशिक्षण मिळेल 
  3. यामुळे तुम्हाला भविष्यात चांगल्या शाळा किंवा शैक्षणिक संस्थांमध्ये चांगल्या कामाच्या संधी मिळतील किंवा तुम्ही स्वतःचे क्लास, संस्था देखील सुरु करू शकता 
  4. प्रशिक्षण काळामध्ये तुम्हाला आपल्या अवतीभोवती काय वेगवेगळ्या संधी आहेत याची माहिती मिळेल तसेच या क्षेत्रामध्ये आपल्या जिल्ह्यात, राज्यात आणि देशभरात काम करणाऱ्या वेगवगळ्या संस्था आणि व्यक्तींची ओळख होईल. त्यामुळे पुढे तुम्हाला चांगले मित्र आणि कामाच्या संधी मिळतील 

मानधन 

रु १०,००० (८,००० मानधन + २,००० प्रवास खर्च). नागपूर किंवा इतर शहरातील काही इच्छुक फेलो निवडले गेले आणि रूम करून राहावे लागले तर त्यांना घर भाडे आणि मेहनत भत्ता म्हणून गरज आणि कार्यक्षमता यानुसार वेगळ्याने रु. २,००० ते ३,००० मिळतील. 

निवड प्रक्रिया 

तुम्हाला फेलोशिप बद्दल अधिक जाणून घ्यायचे असल्यास हा फॉर्म भरून पाठवा. – फेलोशिप नोंदणी फॉर्म

  1. निवड फेरी १ – फेलोशिप निवड प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी कृपया दि. ३ एप्रिल २०२३ सायं. ५ वाजेपर्यंत हा अप्लिकेशन फॉर्म भरा. फॉर्म समजण्यात काही अडचणी असल्यास खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा.
  2. निवड फेरी २ – निवडक अर्जदारांच्या फोन वर मुलाखती होतील, तसेच तुमच्याबद्दल समजून घेण्यासाठी तुम्हाला काही प्रश्न आणि कामे दिली जातील जी तुम्हाला सांगितलेल्या वेळामध्ये पूर्ण करावी लागतील.
  3. निवड फेरी ३ दुसऱ्या फेरीतून निवडलेल्या अर्जदारांची दोन दिवसांची निवड कार्यशाळा होईल. यामध्ये तुम्हाला काही कामे दिली जातील. या कामांमधील तुमची कामगिरी, कौशल्य आणि आवड याच्या आधारावर अंतीम निवड होईल. 

अधिक माहितीसाठी 

तुम्हाला काहीही प्रश्न असतील किंवा अधिक माहिती हवी असेल तर खालील मोबाईल क्रमांकांवर फोन करू शकता. प्रशिक्षणासाठी घराबाहेर राहणे, कामाच्या जागा याबद्दल काही प्रश्न असतील तर लगेच माघार घेण्याची आवश्यकता नाही. निवड फेरी १ आणि २ पर्यंत प्रयत्न करून, योग्य ती माहिती घेऊन पुढील निर्णय घेऊ शकतो आणि त्यासाठी वेळोवेळी आवश्यक ती मदत लर्निंग कंपॅनिअन्स ची टीम करेल. 

संपर्क

प्रारूप – 7350560717; प्रगती – 8551955164 (कॉल करण्याची वेळ – सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.००, सोमवार ते शनिवार)

Fellow story – Nidhi Wasnik 

मी निधी वासनिक. मूळची नागपूर जिल्ह्यातील. माझं पद्व्यूत्तर शिक्षण MSW मध्ये चालू आहे. मी Learning Companions Fellowship २०२२-२४ कोहार्ट ची fellow आहे. सध्या  ‘PAHAL Day... Read More "Fellow story – Nidhi Wasnik "

Fellow Story – Anjali Tiwaskar

मी अंजली तिवसकर. मूळची  नागपूर जिल्ह्यातील. माझं पदव्युत्तर शिक्षण MSW मध्ये झालंय. मी Learning Companions  Fellowship २०२२ -२३ कोहोर्ट ची fellow आहे. सध्या Learning Companions... Read More "Fellow Story – Anjali Tiwaskar"

Fellow story – Vikrant Bhagat

मी विक्रांत भगत. मूळचा वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटचा. Learning Companions  Fellowship २०२१ -२३ कोहोर्टचा मी fellow आहे. सध्या चक्रीघाट सेंटरला ६ ते १५ वयोगटातील मुलांना शिकवितो.... Read More "Fellow story – Vikrant Bhagat"

Fellow Story – Nishant Meshram

I am Nishant Meshram, originally from Sukli in the Nagpur district. I have done my masters in Social Work. I am a 2022-24 cohort fellow... Read More "Fellow Story – Nishant Meshram"

Fellow story – Payal Gahane 

मी पायल गहाणे. मूळची चंद्रपूर जिल्ह्यातील रत्नापूर गावातील असून, माझं पदव्युत्तर शिक्षण MSc. Zoology या  विषयात झालेलं आहे. मी Learning Companions Fellowship २०२२ -२४ Cohort... Read More "Fellow story – Payal Gahane "

Fellow story – Nilesh Doke

मी निलेश डोके. मूळचा नागपूर जिल्ह्यातील मेटपांजरा या गावचा. माझं पदव्युत्तर शिक्षण M.A  Politicle Science  मधून झालं. मी Learning Companions Fellowship, २०२२ -२४ कोहोर्टचा fellow... Read More "Fellow story – Nilesh Doke"

Fellow story – Kanchan Deole 

मी कांचन देवळे. मूळची नागपूर जिल्ह्यातील आसोला या गावची. माझं पदवी शिक्षण B.Com मधून झालं आहे. मी Learning Companions Fellowship, २०२२ -२४ कोहोर्टची fellow आहे.... Read More "Fellow story – Kanchan Deole "

Fellow story – Kalyani Dadmal

मी कल्याणी दडमल, मुळची चंद्रपूर जिल्ह्यातील खेमजाई या गावची आहे. मी Learning Companions Fellowship २०२१-२०२३ कोहोर्ट ची fellow आहे. स्वतःचं ध्येय आणि Intrest काय आहे,... Read More "Fellow story – Kalyani Dadmal"

Fellow story – Varsha Kholye

मी वर्षा खोल्ये. मूळची रत्नागिरी जिल्यातील खालगांव या गावची. Learning Companion Fellowship २०२१ -२३ कोहोर्ट ची fellow आहे. सध्या मी आसोला ( गवळीतोला ) सेंटरला... Read More "Fellow story – Varsha Kholye"

Fellow story – Asmita Bailmare

मी अस्मिता बैलमारे, मूळची वर्धा जिल्ह्यातील तास या गावची. माझं पदव्युत्तर शिक्षण MSW मध्ये झालंय . मी Learning Companions Fellowship २०२१ -२३ कोहोर्ट ची fellow... Read More "Fellow story – Asmita Bailmare"

Fellow story – Kunal Mahurakar

मी कुणाल माहूरकर, Learning Companions Fellowship २०२०-२२ कोहोर्ट चा फेलो आहे. फेलोशिप नंतर मी सोनखांब सेंटर ला सेंटर लीड म्हणून जॉईन झालो. सध्या मी सोनखांब... Read More "Fellow story – Kunal Mahurakar"

LC Photo Bulletin – November 2022

दिनांक - ०२ अक्टूबर - UPAY Learning center - गाँधी जयंती के... Read More "LC Photo Bulletin – November 2022"

Monthly Photo Bulletin – October 2022

दिनांक २ सितंबर - लर्निंग कम्पॅनियन्स की टीम पहुंची InfoCepts office. दिनांक... Read More "Monthly Photo Bulletin – October 2022"

LC Photo Bulletin – September 2022

दिनांक ०२ अगस्त २०२२ - ठनठन - अभिभावकों के साथ की गई... Read More "LC Photo Bulletin – September 2022"

LC Photo Bulletin – August 2022

4 जुलाई २०२२ - Learning companions के नए शैक्षणिक सत्र की शुरुआत... Read More "LC Photo Bulletin – August 2022"

LC Photo Bulletin – July 2022

१ जून २०२२ - लर्निग कंपॅनिअन्स के इस साल के नए cohort... Read More "LC Photo Bulletin – July 2022"

Photo-bulletin May 2022

०२ अप्रैल २०२२- लर्निंग कंपॅनियंस - हमारे cohort २०२० के फेलोज की... Read More "Photo-bulletin May 2022"