Fellow Story – Anjali Tiwaskar
Fellow Story – Anjali Tiwaskar

Fellow Story – Anjali Tiwaskar

मी अंजली तिवसकर. मूळची  नागपूर जिल्ह्यातील. माझं पदव्युत्तर शिक्षण MSW मध्ये झालंय. मी Learning Companions  Fellowship २०२२ -२३ कोहोर्ट ची fellow आहे. सध्या Learning Companions च्या ठणठण (फूकेश्वर) सेंटरला ६ ते १२ वयोगटातील मुलांना शिकविते. 

Graduation मध्ये field वर्क करत असताना मला नेहमी वाटायचं की मी लहान मुलांसोबत काम केले पाहिजे. समज मात्र तेवढी नव्हती. मुलांसोबत काम करण्याच्या शोधात मी २०१९ ला पुण्याला गेले. पुण्यामध्ये गेल्यावर मी NYAS Organization सोबत जुळले. त्या वेळी असं वाटलं की, मला जे हवं होतं ते मिळालं. कारण मुलांसोबत काम करायला मिळणार होतं. परंतु, २०२० मध्ये कोरोना आला आणि सगळं अस्ताव्यस्त झालं. पुण्यामध्ये कोरोना वाढतच चालला होता, त्यामुळे मी पण नागपूरला वापस यायचे ठरवले. नागपूर मध्ये मी MSW साठी स्वामी विवेकांनद कॉलेज ला प्रवेश घेतला. मी कॉलेजला असताना Learning Companions Fellowship बद्दल मला माहिती मिळाली. या Fellowship मध्ये मुलांसोबत काम करण्याची संधी मिळेल, हे मला समजताच Learning Companions Fellowship चा नोंदणी फॉर्म भरला आणि  fellowship साठी माझी निवड झाली. तिथून माझा  Learning Companions सोबतचा प्रवास सुरु झाला.

Fellowship ला जॉईन केल्यानंतर आणखी एकदा घरातून बाहेर पडले. Learning Companions च्या ठणठण सेंटरला झोपडीत राहण्याचा निर्णय पक्का केला. झोपडीमध्ये राहण्याचा माझा एकच उद्देश होता, तो म्हणजे community ची जीवनशैली समजणे आणि सोबतचं आपलं काम चांगल्या पद्धतीने करता येणे. झोपडीमध्ये राहण्यास खूप सारा त्रास होणार याची जाणीव होती. परंतु स्वतःला एक exposer द्यायचे होते. असंही आयुष्य जगून बघायचं होतं. प्रवास खूप कठीण होता, मात्र मज्जा देखील खूप येत होती. स्वतःला रोज आपण धाडसी झालोय असं वाटत होतं. आपल्या जीवनशैलीतून नवीन जीवनशैलीला अनुभव करताना स्वतः सोबत समाजाची जाणीव व्हायला सुरुवात झाली. काम करताना मी कुठे आणखी चांगलं करू शकते, मी कुठे कमी पडते हे रोज मला नव्याने कळते. प्रत्येक क्षणाला नव-नवीन प्रॉब्लेम डोळ्यांसमोर असतो, त्याला खंबीरपणे सामोर जाण्यास मला आता भीती वाटत नाही. Learning Companions Fellowship चा प्रवास माझ्या हृदयाच्या खूप जवळचा आहे. कारण या Fellowship मुळे मला समाजबद्दलची आपुलकी आणि सोबतच माझं देणं काय, हे ओळखण्यात मदत होत आहे. काम तर होतच आहे, पण सोबतच एक माणूस म्हणून मी या प्रवासात घडत आहे.

या वर्षी फेलोशिपचा भाग होण्यासाठी आजच रजिस्टर करा आणि आमच्या फेसबुक, इंस्टाग्राम page ला subscribe करा! लवकरच तुम्हाला पुढील तपशील आमच्या page वर मिळतील!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *