Learning Companions
नेहमी विचारले जाणारे प्रश्न

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

 1. फेलोशिप नेमकी कशाबद्दल आहे?

फेलोशिप चे दोन मुख्य उद्देश आहेत. एक, जी मुले चांगल्या शाळेपर्यंत पोहचू शकत नाहीत त्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी प्रत्यक्ष काम करणे. संस्थेचे नागपूर परिसरात काही community learning सेंटर आहेत जिथे आपण मुलांना पूर्णवेळ शिकवतो. दोन, या प्रक्रियेत फेलो ला प्रत्यक्ष काम करता करता शिकणे-शिकवण्याची प्रक्रिया समजून घेणे, शिक्षण क्षेत्रातील लीडरशिप, आव्हाने, संधी याविषयी प्रशिक्षण भेटते. तुम्हाला पुढील संधींची माहिती मिळते. ज्याद्वारे विविध NGO, शाळा आणि प्रशासकीय स्तरावर चांगल्या प्रशिक्षित युवांची फळी तयार होईल ज्यातून शिक्षण क्षेत्रातील बदल प्रत्यक्षात आणता येईल. 

 1. निवड प्रक्रिया कशी होते?

प्रत्यक्ष शिकवायचे कसे, शिक्षण क्षेत्रातील इतर कामे याबद्दल आधीच माहित असण्याची गरज नाही, ते प्रशिक्षण तुम्हाला फेलोशिप दरम्यान मिळेल. मात्र ज्यांना मुलांची आवड आहे, शिक्षण क्षेत्राबद्दल तळमळ आहे आणि भरपूर शिकण्याची आणि मेहनत घेण्याची तयारी आहे असे candidate मिळावे यासाठी तीन फेरींची निवड प्रक्रिया होते. 

निवड फेरी १ – फेलोशिप निवड प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी कृपया दि. ६ एप्रिल २०२३ सायं. ५ वाजेपर्यंत अप्लिकेशन फॉर्म भरा. फॉर्म समजण्यात काही अडचणी असल्यास खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा. पहिल्या फेरीचे निकाल साधारण १० एप्रिल पर्यंत जाहीर होतील. 

निवड फेरी २ – निवडक अर्जदारांच्या फोन वर मुलाखती होतील, तसेच तुमच्याबद्दल समजून घेण्यासाठी तुम्हाला काही प्रश्न आणि कामे दिली जातील जी तुम्हाला सांगितलेल्या वेळामध्ये पूर्ण करावी लागतील. मुलाखती २३ ते २६ एप्रिल दरम्यान होतील.

निवड फेरी ३ – दुसऱ्या फेरीतून निवडलेल्या अर्जदारांची दोन दिवसांची निवड कार्यशाळा होईल. यामध्ये तुम्हाला काही कामे दिली जातील. या कामांमधील तुमची कामगिरी, कौशल्य आणि आवड याच्या आधारावर अंतीम निवड होईल. निवड कार्यशाळा दोन टप्प्यांमध्ये मे महिन्याच्या दुसरा आठवड्यात होतील. अंतीम निवड झालेल्या उमेदवारांची यादी मे तिसऱ्या आठवड्यात जाहीर होईल.

 1. Fellowship ची प्रक्रिया एवढी लांब का आहे? 

निवड प्रक्रियेमध्ये साधारण चांगले उमेदवार शोधण्यासाठी शहरातील जवळपास ३०-४० कॉलेज मध्ये जाऊन, फेसबुक द्वारे माहिती द्यावी लागते. त्यानंतर आमच्यापर्यंत आलेल्या जवळपास ६५० अर्जांची काळजीपूर्वक छाननी करावी लागणार आहे. साधारण ७०-८० मुलाखती घ्याव्या लागतात. कोणत्याही चांगल्या संस्थेमध्ये जेव्हा तुम्ही जाणार तेव्हा निवड प्रक्रियेला अशा प्रकारे वेळ लागतो. चांगला candidate मिळावा आणि सर्वांना योग्य न्याय मिळावा यासाठी ही प्रक्रिया काळजीपूर्वक व्हावी हा त्यामागचा उद्देश असतो. काही लोकांना Fellowship चा फॉर्म लवकर मिळतो तर काहींना वेळाने माहिती होते, त्यामुळे त्यांना देखील संधी मिळावी. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये patience ठेवणे गरजेचे असेल. त्यासाठी तयारी बद्दल धन्यवाद! 

 1. Graduation Third year किंवा post-graduation अंतीम वर्ष चालू आहे तर selection होणार का? 

हो. कारण, फेलोशिप जून महिन्यात सुरु होते. तोपर्यंत तुमचे शिक्षण पूर्ण झालेले असेल. 

 1. माझं graduation पूर्ण नसेल तर apply करू शकतो का? stipend मिळेल का? 

फेलोशिप दरम्यान full-time काम करावे लागते. त्यामुळे शिक्षण सुरु असताना फेलोशिप करता येत नाही. मात्र यावेळी आम्ही एक नवीन संधी तयार करत आहोत. ज्यांचे शिक्षण अजून पूर्ण नाही झाले, मात्र फेलोशिप मध्ये इंटरेस्ट आहे, त्यांची जर शेवटच्या राऊंड पर्यंत निवड झाली, तर त्यांची आम्ही आमच्या ‘Fellowship Stage 0’ कार्यक्रमासाठी निवड करणार आहोत. यामध्ये तुम्हाला तुमचे कॉलेज करता करता महिन्याला साधारण १०-१२ तास वेळ देऊन काही इंटरेस्टिंग कामे करता येतील ज्यामुळे तुम्हाला काही नवीन कौशल्य, ज्ञान मिळेल, जेणेकरून कॉलेज पूर्ण होण्याच्या आधीच तुमची भविष्यातील कामाच्या दृष्टीने तयारी होईल. यामध्ये ३ प्रकारच्या कामांचा समावेश असेल.  

 1. शिक्षणाविषयी काही उत्तम लेख, व्हिडीओ, पुस्तके यांचा अभ्यास. याच्या आधारावर काही चाचण्या होतील आणि त्याचे सर्टिफिकेट मिळेल. 
 2. तांत्रिक ऑनलाईन – काही ऐच्छिक, तांत्रिक कोर्स, जसे की Microsoft Excel, Documentation, Video Editing इ. 
 3. युवा शिबिरे – तुम्हाला महाराष्ट्रातील विविध युवा शिबिरांची माहिती मिळेल. तुम्ही तुमचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत यातल्या एखाद्या शिबिरात तुम्ही भाग घेऊ शकता. 

या काळात कुठलेही मानधन नाही मिळणार. मात्र तुम्हाला उत्तम गुणवत्तेचे प्रशिक्षण मोफत मिळेल, ज्यामुळे कॉलेज नंतरच्या संधींसाठी तुम्ही अधिक सक्षम बनाल. 

 1. मला इथे काय काम करावं लागेल?

फेलोशिप च्या काळात आपल्याला मुलांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देता यावे आणि तुमचे शिक्षक म्हणून खूप चांगले प्रशिक्षण व्हावे यासाठी तुम्हाला खालील कामे करावी लागतील. यासाठी आवश्यक कौशल्ये आणि माहिती तुम्हाला आधीच असली पाहिजे याची गरज नाही. तुम्हाला यातील प्रत्येक गोष्टीचे प्रशिक्षण आणि वेळोवेळी मदत मिळेल. फक्त तुम्हाला नवीन गोष्टी शिकण्याची आवड आणि तयारी असणे हे सर्वात महत्वपूर्ण आहे. 

 1. सर्व प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करणे, शिक्षणासाठी आवश्यक अभ्यास आणि कामे वेळेवर आणि आवडीने पूर्ण करणे 
 2. तुम्हाला नेमून दिलेल्या वर्गाला शाळेच्या वेळापत्रकाप्रमाणे नियमित शिकविणे 
 3. मुलांच्या शिक्षणाविषयी जागृती निर्माण व्हावी आणि मुलांच्या शिक्षणातील पालकांचा सहभाग वाढावा यासाठी नियमितपणे पालकांच्या घरी भेटी देणे, गावामध्ये वेगवेगळे कार्यक्रम घेणे, पालकसभा घेणे 
 4. मुलांना शिकवण्यासाठी तुम्हाला दिले गेलेल्या साधने आणि प्रशिक्षण याच्या मदतीने चांगल्या पद्धतीने वर्ग, पाठाची तयारी करणे 
 5. सर्व कामांचे नियोजन तसेच कामाबद्दल रिपोर्टींग यासाठी आवश्यक माहिती गोळा करणे, फॉर्म भरणे, कंप्युटर वर माहिती भरणे इ. 
 1. यासाठी किती वेळ द्यावा लागतो?

हे पूर्णवेळ काम आहे आणि हा तुमच्या आयुष्यातील महत्वाचा शिकण्याचा टप्पा आहे, हे कृपया लक्षात घ्यावे. आणि म्हणून हे काम करणे आणि त्यातून शिकणे यासाठी पूर्ण वेळ असेल तरच फेलोशिप मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घ्यावा. 

फेलोशिप दरम्यान सकाळी १० ते ४ या वेळात मुलांना प्रत्यक्ष शिकवण्याची जबाबदारी असते. त्याशिवाय वर्गासाठी पाठाचे नियोजन, शिक्षक म्हणून तयार होण्यासाठी आवश्यक अभ्यास, कार्यशाळांमध्ये सहभागी होणे, संबंधित documentation या कामांमध्ये पूर्णवेळ सहभाग घ्यावा लागतो.

 1. मला जर शिकवण्याचे, कामाचे ट्रेनिंग नसेल तर काय? 

ही फेलोशिप मुळात शिक्षक म्हणून प्रशिक्षण होणे आणि शिक्षण क्षेत्राची समज निर्माण होणे यासाठी आहे. तुम्हाला आधीच्या कोणत्याही ट्रेनिंग ची गरज नाही. तुम्हाला फेलोशिप च्या काळात नियमितपणे प्रशिक्षण मिळेल. 

 1. मी नागपूर सोडून इतर भागात आधीच एखादे सेंटर चालवत असेल तर ते चालवण्यासाठी मला ही फेलोशिप मिळेल का?

आमचे काम सध्या नागपूर मध्येच आहे. त्यामुळे इतर ठिकाणी किंवा स्वतःहून काम करण्यासाठी आम्ही फेलोशिप/मानधन देत नाही. मात्र तुम्हाला स्वतःहून काम करायचे असेल तर तुम्ही फेलोशिप चा भाग बनू शकता आणि सर्व प्रशिक्षण मोफत मिळवू शकता, फक्त त्यासाठी तुम्हाला कोणत्याही मानधनाची सोय आम्ही करू शकणार नाही. 

 1. फेलोशिप साठी किती stipend मिळतो?

रु १०,००० (८,००० मानधन + २,००० प्रवास खर्च). नागपूर किंवा इतर शहरातील काही इच्छुक फेलो निवडले गेले आणि रूम करून राहावे लागले तर त्यांना घर भाडे आणि मेहनत भत्ता म्हणून गरज आणि कार्यक्षमता यानुसार वेगळ्याने रु. २,००० ते ३,००० मिळतील. (कृपया लक्षात ठेवा कि हा जॉब नाही, तुम्हाला जे मानधन मिळते ते केवळ तुमचे शिक्षण चालू असताना तुम्हाला स्वतःचे खर्च भागवता यावे यासाठी मिळते. तसेच तुम्ही जाणीवपूर्वक NGO क्षेत्रात प्रवेश घ्यायचा विचार करत आहात, हे लक्षात ठेवा. इथे लोकांसाठी काम करणे आणि त्यातून मिळणारे समाधान ही प्राथमिकता असते. तुम्ही स्वतःच्या कौशल्यांवर पुरेशी मेहनत घेतली तर तुम्हाला साधारण समाधानाने जगता येतील इतके पैसे NGO क्षेत्रात देखील नक्कीच मिळतात. पण भरपूर पैसे लागणारी स्वप्ने असतील तर NGO क्षेत्र ही त्यासाठी चुकीची जागा आहे हे लक्षात ठेवा!