Fellow story – Vikrant Bhagat
Fellow story – Vikrant Bhagat

Fellow story – Vikrant Bhagat

मी विक्रांत भगत. मूळचा वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटचा. Learning Companions  Fellowship २०२१ -२३ कोहोर्टचा मी fellow आहे. सध्या चक्रीघाट सेंटरला ६ ते १५ वयोगटातील मुलांना शिकवितो. Graduation नंतर काय करायचे हा प्रश्न प्रत्येकाला येतो. तसा तो मला सुद्धा येत होता. त्या विचारात असतानाच अचानक कोरोना महामारी आली आणि lockdown सोबत माझ्या शिक्षणाला देखील lockdown लागलं.  

काही वर्षापासून मित्रांकडून मी Learning Companions  चा प्रवास पाहत होतो. मित्रांमुळे इथे येण्याची संधी मला दिसली. घरी काही न करत असताना काही चांगलं करण्याची संधी म्हणून Learning Companions सोबत जुळलो. माझ्या प्रवासाची सुरुवात पिपळा (भदी) या बेड्यावर काम करण्यापासून झाली. आधी तर नवीन community सोबत जुळणे, त्यांना समजणे, मुलांसाठी मैत्रीपूर्ण आणि शैक्षणिक वातावरण निर्माण करणे, यातच वेळ गेला. काम करत असताना बऱ्याच अडचणींतून जावं लागलं, त्रास झाला. पण खूप अडचणींवर मात केल्यावर शेवटी मी काय चांगलं करू शकलो हे पाहू शकतो, तेव्हा मात्र खूप मस्त वाटतं. आणि कोणतीच गोष्ट आपल्याला थांबवू शकत नाही हा आत्मविश्वास येतो.

या प्रवासात मी खूप काही शिकलो स्वतःचे कौशल्य ओळखले. नवीन कौशल्ये आत्मसात केले. सोबतच पिपळा (भदी) , कुहिफाटा आणि आता चक्रीघाट अश्या तीन वेगवेगळ्या center वर  दोन वर्ष काम केले.  त्या कामा दरम्यान अनेक लोक जुळले ज्यांनी हा प्रवास सोपा केला. माझा नेहमी हाच प्रयत्न राहला की मी आपल्या मुलांसाठी शिक्षणाचा प्रवास कसा सोपा करावा.  तसेच त्यांच्यासोबत माझी देखील  मजेत learning व्हावी! या दोन वर्षाच्या प्रवासात खरच खूप मजा  आणि आनंद मला मिळाला. 

या वर्षी फेलोशिप चा भाग होण्यासाठी आजच रजिस्टर करा आणि आमच्या फेसबुक, इंस्टाग्राम page ला subscribe करा! लवकरच तुम्हाला पुढील तपशील मिळतील आमच्या page वर मिळतील!

https://forms.gle/NGhn7Enw8XvEPVyd7

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *