Fellow story – Kanchan Deole 
Fellow story – Kanchan Deole 

Fellow story – Kanchan Deole 

मी कांचन देवळे. मूळची नागपूर जिल्ह्यातील आसोला या गावची. माझं पदवी शिक्षण B.Com मधून झालं आहे. मी Learning Companions Fellowship, २०२२ -२४ कोहोर्टची fellow आहे. सध्या Learning Companions आसोला गवळीटोला या सेंटरला ३ ते ५ वयोगटातील मुलांना शिकवते. 

माझं पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर घरी राहून जीवन कंटाळवानं झालं होतं. तेव्हा Learning Companions Fellowship मध्ये सुरुवातीला एक volunteer म्हणून मला काम करण्याची संधी अचानक मिळाली. 

चार – पाच महिने volunteer म्हणून काम केल्यानंतर मी फेलोशिप निवड प्रक्रियेत भाग घेतला आणि निवड झाल्यानंतर माझ्या fellowship प्रवासाला सुरुवात झाली. Volunteering करतांना मुलांमध्ये वावरण्याची सवय मला झाली होती. त्यामुळे लहान मुलांना शिकवण्याचे बीज मनात आपोआप निर्माण झाले. सोबतच मुलांमध्ये माझा आनंदही मला दिसू लागला. पण या दोन्ही गोष्टीला काही आकार मात्र मला दिसत नव्हता. तो फक्त माझ्या मनात असलेला एक विचार होता.

परंतु जेव्हा Learning Companions Fellowship मध्ये सामील झाले तेव्हा माझ्या या दोन्ही विचारांना एक विशिष्ट रूप प्राप्त झाले. या Fellowship प्रवासात एक शिक्षक म्हणून मी सक्षम होत आहे. मुलांना ओळखण्याची समज माझ्यामध्ये निर्माण झाली आहे. आजूबाजूच्या गोष्टी बघून मला नेहमी समाजात वावरण्याची भीती वाटायची. पण या काही दिवसांत माझा Confidence निर्माण झाला. स्वतःच्या निर्णयांवर जगणे मला Learning Companions Fellowship मध्ये आल्यानंतर कळले. 

Documents बनविणे, Story Telling करणे, Presentation देणे, पुस्तक वाचण्याची सवय स्वतःला लावणे अशा अनेक गोष्टी शिकायला मिळत आहेत. खाली डब्याप्रमाणे प्रत्येक लहान-लहान गोष्टी शिकून मी स्वतःमध्ये भरत आहे. त्याबद्दल या संधीचे खूप आभार! 

या वर्षी फेलोशिप चा भाग होण्यासाठी आजच रजिस्टर करा आणि आमच्या फेसबुक इंस्टाग्राम page ला subscribe करा! लवकरच तुम्हाला पुढील तपशील आमच्या page वर मिळतील!

https://forms.gle/NGhn7Enw8XvEPVyd7

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *