Fellow story – Nilesh Doke
Fellow story – Nilesh Doke

Fellow story – Nilesh Doke

मी निलेश डोके. मूळचा नागपूर जिल्ह्यातील मेटपांजरा या गावचा. माझं पदव्युत्तर शिक्षण M.A  Politicle Science  मधून झालं. मी Learning Companions Fellowship, २०२२ -२४ कोहोर्टचा fellow आहे. सध्या Learning Companions च्या सोनखांब या सेंटरला ५ ते १२ वयोगटातील मुलांना शिकवतो. 

लहान असताना सगळेजण स्वप्न बघतात. त्याप्रमाणे मी पण Fashion Designing करण्याचं स्वप्न बघितलं होतं. परंतु माझ्या त्या स्वप्नाला एक भीती नेहमी वाटायची की, “लोक काय म्हणतील ?” त्या भीतीतून, त्या एका विचारातून बाहेर पडायला त्यावेळी कोणतेही मार्गदर्शन मला मिळाले नव्हते. मन नेहमी पर्याय शोधत असते. त्यावेळी मग मी पण fashion designing चा विचार सोडून, एक शिक्षक बनण्याचं स्वप्न पाहू लागलो. Corona काळात या स्वप्नाचा पाठलाग करत मी मेटपांजरा येथील जिल्हा परिषद शाळेत सतत तीन वर्षे निशुल्क मानधनाने मुलांना शिकविले. 

एके दिवशी Instagram बघत असताना मला Learning Companions Fellowshipची post दिसली. तेव्हा fellowship ची संपूर्ण नोंदणी प्रक्रिया मला एका मैत्रिणीने सांगितली. दोन ते तीन महिन्यांच्या निवड प्रक्रियेनंतर माझं fellowship साठी selection झालं. 

एक आदर्श शिक्षक कसा घडू शकतो ते मी fellowship मध्ये पाहत आहे.  जिल्हा परिषद शाळेत शिकवत असताना मुलांना फक्त पुस्तकी शिकवायचो. पण मुलांना जर खेळीमेळीच्या वातावरणात शिकविले तर त्यांच्या मनात शिक्षणाप्रती आणखी रुची निर्माण होते, हे Learning Companions मध्ये आल्यावर मला समजले. 

आधी मी कोणतेही काम करत असताना ते काम वेळेवर करत नव्हतो. मला वेळेचे महत्व फारसे समजत नव्हते, परंतु जेव्हापासून मी Fellowship प्रवासात एक fellow म्हणून आलो; तेव्हापासून वेळेचे नियोजन मला करता येत आहे. एक उत्कृष्ट शिक्षक बनण्याचे जे स्वप्न मी पाहत होतो , ते स्वप्न Learning Companions मध्ये पूर्ण होताना मला दिसत आहे. माझ्या शिक्षक बनण्याच्या प्रवासात उपयुक्त कौशल्य मला शिकायला मिळत आहे. मुलांना शिकविताना स्वतःच्या learnigs होत आहे, त्यातून मला वेगळाच आनंद मिळत आहे.

या वर्षी फेलोशिपचा भाग होण्यासाठी आजच रजिस्टर करा आणि आमच्या फेसबुक, इंस्टाग्राम page ला subscribe करा! लवकरच तुम्हाला पुढील तपशील आमच्या page वर मिळतील!

https://forms.gle/NGhn7Enw8XvEPVyd7

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *