Fellow story – Varsha Kholye
Fellow story – Varsha Kholye

Fellow story – Varsha Kholye

मी वर्षा खोल्ये. मूळची रत्नागिरी जिल्यातील खालगांव या गावची. Learning Companion Fellowship २०२१ -२३ कोहोर्ट ची fellow आहे. सध्या मी आसोला ( गवळीतोला ) सेंटरला ६ ते १२ वयोगटातील मुलांना शिकविते. सोबतच fellow advisor म्हणून काही जबाबदाऱ्या सांभाळते. 

मी जेव्हा स्वतःला एक वर्षापूर्वी वळून पाहते तर, तेव्हाची वर्षा आणि आत्ताची ‘मी’ यामध्ये मला स्पष्ट सकारात्मक बदल जाणवतो. त्याचे संदर्भ मला अनेक जणांकडून मिळतात जसे फॅमिली, मित्र परिवार इ. 

Learning Companions मध्ये माझे काम करत असलेले काही मित्र त्यांचे मुलांसोबतचे फोटोज सोशल मीडियावर शेअर करत होते. त्यांचे ते फोटोज बघून मलाही मुलांसोबत काम करण्याची तीव्र इच्छा झाली. त्यामुळे मुलांसाठी काम करावं, या हेतूने मी Learning Companions मध्ये आले.

मला काही कारणांमुळे माझं बालपण जगता आलं नव्हतं. आणि बालपणातील हरविलेला तोच आनंद मला संपूर्ण वर्षभर मिळत आहे. मुलांसोबत काम करताना मी स्वतःसाठी जगत आहे. हळूहळू मिळत असलेल्या संधीतून थोडा-थोडा पुढाकार घेऊन स्व-आत्मविश्वास मजबूत करण्यावर भर दिला. Fellowship प्रवासात येण्याअगोदर मला एक-दोन माणसांसमोर बोलायलासुद्धा भिती वाटत होती. परंतु, इथे मिळालेल्या संधीमधून आता किमान ५०-१०० लोकांसमोर मी करत असलेले काम आत्मविश्वासाने मांडू शकते आणि हीच गोष्ट माझ्यासाठी खूप महत्वाची आहे, जी मला इथे शिकायला मिळाली.सोबतच learning companions मधील culture मुळे स्वतःच्या मतांना स्थान मिळालं. स्वतःचे विचार मांडण्याचे स्थान मिळाल्याने व्यक्त होता आलं, ज्यामुळे करत असलेले काम माझ्यासाठी learning ची प्रोसेस आहे असे वाटते. आणि ती प्रोसेस मी अजूनही जगत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *