Fellow story – Asmita Bailmare
Fellow story – Asmita Bailmare

Fellow story – Asmita Bailmare

मी अस्मिता बैलमारे, मूळची वर्धा जिल्ह्यातील तास या गावची. माझं पदव्युत्तर शिक्षण MSW मध्ये झालंय . मी Learning Companions Fellowship २०२१ -२३ कोहोर्ट ची fellow आहे. सध्या Learning Companions च्या चक्रीघाट सेंटरला ६ ते १२ वयोगटातील मुलांना शिकविते. सोबतच एक fellow advisor म्हणून जबाबदारी  सांभाळते.

अवघड काळात वळणावर चालत असताना स्वतःला दिशा देण्यासाठी नकळत सुरु झालेला प्रवास म्हणजे Learning companions Fellowship. Corona काळात घरात बसून, पुस्तकं वाचून – वाचून कंटाळले आणि एका मैत्रिणीचे Whatsapp status ला व्हिडीओ बघून प्रेरीत झाले. तिच्याच मार्गदर्शनातून मी इथे येण्याचा निर्णय घेतला.

मी Learning Companions ची fellowship करायला घरातून बाहेर पडले, ते स्वतःला सिद्ध करण्यासाठी, व्यक्तिमत्व विकासासाठी, स्वतःमधील  कौशल्य विकसित करण्यासाठी. “मला खूप काही शिकायचं आहे,” हा विचार घेऊन  मी या संस्थेत जुळले. सोबतच मला काय हवंय? या प्रश्नाचा शोध घेत,ध्येयाकडे वाटचाल सुरू झाली.

जेव्हा fellowship ची सुरुवात झाली तेव्हा काम समजुन घेण्यासाठी, लहान मुलांना, community मधील लोकांना, सोबतच अनोळखी जागेला समजण्यासाठी आणि ते आपलं म्हणून स्वीकारायला खूप अडचणी गेल्या, त्रास झाला. पण त्यावर मात करत आपल्याला काय हवंय ते समोर ठेऊन,त्यातुन निघाले. सर्व आपलेसे झाले आणि  रोजच्या किरकोळ अडचणीचा पण सोबत प्रवास सुरू झाला. Fellowship प्रवासात मी छोटी-मोठी अनेक कौशल्य शिकले, जे स्वतःमध्ये होते त्याला आणखी पक्के केले. त्या सगळ्या कौशल्यांची मला मोजणी करतायेणार नाही . तरीही  माझी fellowship मधील सर्वात महत्वाची Learning काय यासाठी एक प्रसंग सांगेन.   मला एका घटनेचा खूप त्रास झाला होता. मी सुरुवातीला एक सेंटर ला काम करत होते, जिथल्या लोकांशी मनाने खूप जुळलेले होते. जेव्हा काही कारणांनी ती जागा सोडावी लागली तेव्हा  मला त्यातुन निघता येत नव्हते . त्यावेळी मी एक गोष्ट प्रकर्षाने शिकले आणि अमलात देखील आणली. ते म्हणजे, ‘आपण कोणतीही गोष्ट पूर्णत्वाला नेऊ शकत नाही, तर फक्त त्या प्रक्रियेचा भाग होऊ शकतो.’ Fellowship दरम्यान community सोबत काम करत असतांना मला मिळालेली ही सर्वात मोठी शिकवण आहे. 

या वर्षी फेलोशिप चा भाग होण्यासाठी आजच रजिस्टर करा.आमच्या फेसबुक, इंस्टाग्राम page ला subscribe करा! लवकरच तुम्हाला पुढील तपशील आमच्या page वर मिळतील!
https://forms.gle/NGhn7Enw8XvEPVyd7

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *