Fellow Story – Pallavi Dodke
Fellow Story – Pallavi Dodke

Fellow Story – Pallavi Dodke

मी पल्लवी दोडके. मूळची चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. माझं पदव्युत्तर शिक्षण MSW मध्ये झालेले आहे. मी  Learning companions Fellowship 2023-25 कोहोर्ट ची  fellow आहे. सध्या मी चक्रीघाट सेंटरची फेलो असून, फेलोशिपमधील प्रोजेक्ट रियाझघर अंतर्गत ६ ते १२ वयोगटातील मुलांना शिकविते. 

MSW करत असताना कॉलेजच्या विविध उपक्रमामध्ये लहान मुलांसोबत संपर्क येत होता. तेव्हा एवढी स्पष्टता आली होती कि मला लहान मुलांसोबत काम करायला आवडते. पण तेच काम आपण करावे का? हा प्रश्न मात्र सुटला नव्हता. माझी एक मैत्रीण लर्निंग कंपॅनिअन्स फेलोशिपला तेव्हा काम करत होती. तिच्या फेलोशिप प्रवासातील छोट्या छोट्या  गोष्टी ऐकून, मी देखील फेलोशिप करावी हि इच्छा मनात निर्माण झाली. आणि मी फेलोशिप चा फॉर्म भरला. मैत्रीण जरी फेलोशिप करत असली तरी मला पूर्ण फेलोशिप अजूनही पूर्णपणे कळली नव्हती. फॉर्म भरल्यानंतर जेव्हा माझी निवड झाली आणि मी एका महिन्याचे ट्रेनिंग केले तेव्हा मिळालेल्या वेगवेगळ्या टास्क मधून  खूप साऱ्या संकल्पना माझ्या स्पष्ट होत गेल्या. तेव्हा मला एक चांगल्याने समजले कि फेलोशिप करण्याचा माझा निर्णय योग्य आहे. 

सुरुवातीला भारवाड समुदायात काम करणे मला आव्हानात्मक वाटायचे. परंतु फेलोशिप मधील एक-दोन companions सोबत असल्याने तो प्रवास सोपा होत गेला. एकत्र येऊन कार्यक्रम करणे, समुदायाच्या सण-उत्सवात सहभागी होणे, मुलांना आपुलकीने वागवणे या छोट्या-छोट्या गोष्टींतून नातं घट्ट होत गेलं.

या संपूर्ण प्रवासात माझे अनेक बदल मला दिसतात. काम करताना मनात असलेल्या भीती दूर होऊन निर्माण झालेला आत्मविश्वास ही सगळ्यात मोठी माझी लर्निंग दिसते. शिक्षिका म्हणून विकसित होताना माझ्या अनेक पैलूवर काम करायला मला मिळत आहे. मुलांच्या पालकांसोबत बोलणे, documentation करणे,  स्टोरी टेलिंग, ppt बनवणे, मुलांना शिकविणे, मुलांसाठी पाठ नियोजन करणे, वेळेचे नियोजन इत्यादी अनेक कौशल्य मी फेलोशिप मध्ये शिकत आहे. 

Learning Companions Fellowship 2024 साठी निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. 

आजच apply करा!

नोंदणी फॉर्म :

https://forms.gle/fQvPs3jzLiuyc4bW6

अर्ज करण्यासाठी फॉर्म –   https://forms.gle/Gn8q3Me2u1PoSK5Y6 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *