Fellow Story – Sushma Maharwade
Fellow Story – Sushma Maharwade

Fellow Story – Sushma Maharwade

मी  सुषमा  महारवाडे, मी मूळची गोंदिया जिल्ह्यातील. माझं पदव्यूत्तर शिक्षण M.A. (Political science) या विषयात झालेलं आहे. मी learning companions fellowship 2023-2025 cohort ची fellow आहे. सध्या असोला सेंटरला प्राथमिक गटातील मुलांना शिकवत आहे. 

माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही दिवस स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना लर्निंग कंपॅनिअन्स फेलोशिप बद्दल मला कळले. माझे काही मित्र मंडळी तेव्हा हि फेलोशिप करत होते. फेलोशिप मधील अनेक गोष्टी मी पण ऐकत होते. त्यांचं काम ऐकून, त्यांच्याकडे बघून मी पण फॉर्म भरायचा विचार केला. आणि आज जेव्हा मी स्वतःला बघते तर फेलोशिप करायचा माझा निर्णय योग्य आहे असे लक्षात येते. 

मी स्वत:ला आज जेव्हा मागे वळून पाहते तर माझ्यामध्ये आज खुप बदल मला जाणवतो. Learning companions Fellowship मध्ये आल्यावर कळलं की शिक्षण म्हणजे  काय. मला लहानपनापासूनच शिकताना मजा आली पाहिजे वाटायचं ते शिक्षण मला इथे अनुभवायला मिळालं. Learning companions मध्ये activity, Project च्या माध्यमातून शिकविले जाते. त्यामुळे मुलं जितकं वर्गात शिकणं enjoy करत असतात तेवढंच मी त्यांना शिकविताना enjoy करते. त्यांना शिकविताना स्वतःला खूप सारे reflections होतात, जे माझ्या growth साठी खूप महत्वाचे वाटतात. मला या एका वर्षात अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. मी एक शिक्षिका म्हणून तर अनेक कौशल्य शिकतच आहे. सोबतच documentation, communications, team work, presentation, story telling असे अनेक कौशल्य शिकत आहे. यामुळे माझा आत्मविश्वास वाढलेला आहे. आधी समोरच्या व्यक्तीशी बोलताना मी घाबरत होते, परंतु आज  स्वतःचे मत मी  confidently मांडू शकते.

Learning Companions Fellowship 2024 साठी निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. 

आजच apply करा!

नोंदणी फॉर्म: https://forms.gle/fQvPs3jzLiuyc4bW6

अर्ज करण्यासाठी फॉर्म:  https://forms.gle/Gn8q3Me2u1PoSK5Y6

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *