LC Photo Bulletin – August 2023
LC Photo Bulletin – August 2023

LC Photo Bulletin – August 2023

संकलन आणि संपादन – जान्हवी काळे

नवीन शाळा नवीन प्रवास (सोनखांब)

– निलेश ढोके

मेहुलला सातवी नंतरच्या शिक्षणासाठी तालुक्याला पाठवायचा मी विचार केला होता मात्र मेहूलची आई त्याला बाहेरगावी पाठवायला तयार नाही, तालुक्याला तर नाहीच नाही.

तरीदेखील पालकांशी बोलण्यासाठी मी त्यांच्याकडे गेलो आणि पालकांना पोरांच्या बाहेरगावी शिकवण्याबद्दल  काय मत आहे ते सांगायला लागलो. बाहेरगावी पोरांना पाठवणे यावर त्यांचा पूर्णतः नकार होता. अगर भेजेंगे तो दोनों को साथ में. तरी देखील माझ्याने जमेल तेवढं मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला आणि तिथून परत आलो. दुसऱ्या दिवशी माझ्या लक्षात आलं की गावाजवळील मेटपांजरा या गावी  जी शाळा आहे तिथे सातवी नंतरच्या शिक्षणासाठी आपण मेहुल ला पाठवू शकतो आणि जवळच असल्यामुळे पालक तयारही होतील! आणि मी त्यानंतर गावाजवळील  मेटपांजरा या गावातील शाळेच्या मुख्याध्यापकांना भेटलो व त्यांना आमच्या बेड्यावरील दोन मुलांना आपल्या शाळेत प्रवेशद्यायचा होता असा संवाद साधला व त्यांनी लगेच यासाठी होकार दिला. 

    विक्रम आणि मेहुल च्या पालकांचे मेहुल ला जर बाहेरगावी शिकवायचे असेल तर दोघाही भावांना सोबतच बाहेरगावी जाऊ देईल” असे म्हणणे असल्यामुळे विक्रम ची टीसी काढणे देखील गरजेचे होते. शिक्षकांसोबत या परिस्थितीवर संवाद झाला तरी देखील विक्रम  ची टी. सी. देण्यास त्यांनी नकार दिला. त्यानंतर मी मेहुल आणि विक्रमला ग्राम विकास विद्यालय मेटपांजरा या शाळेत घेऊन आलो तिथे मेहुल ची टीसी मुख्याध्यापकांना दिली व “विक्रमची टी.सी. एक-दोन दिवसात आणून देतो” असे सांगितले आणि तिथून बेड्यावर  परत आलो. हे काम लगेच झाले नाही. मात्र या दरम्यान मी  मुलं  नवीन  शाळेत काय करत आहेत, त्यांची प्रगती कशी चालू आहे हे तिथल्या गोष्टी पालकांना सांगायचो.  त्यांच्या आई-वडिलांनादेखील मुलं रोज वेळेवर तयार होत आहे, शाळेत जात आहे, हे सगळं पाहून छान वाटत होते.  विशेषतः मेहुल ची नवीन शाळेतील प्रगती पाहून त्याच्या आईवडिलांना दोन शाळेतील फरक जाणवत होता आणि त्याचं कौतुक वाटत होतं. ही सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर स्वतः रतन दीदी (दोघांची आई) स्वतः मुख्याध्यापकांशी बोलायला विक्रमच्या शाळेत गेली. त्यांनी पुढाकार घेऊन शिक्षकांशी आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी बाहेरगावी जाणे  का महत्त्वाचे हे पटवून दिले व सोनखांब या शाळेतून टी. सी. काढून घेतली.

         अशा पद्धतीने विक्रम चे नाव देखील नवीन शाळेत दाखल करण्यात आले व आता दोघेही रोज बाहेरगावी शाळेत जाण्याचा प्रवास करत आहेत. जे पालक मुलांच्या बाहेरगावी जाण्याचा विरोध करत होते  त्यांनी स्वतः मुलाची टी. सी. मिळवण्यासाठी पुढाकार आणि मेहनत घेतली या दोघांना पाहून पालक फार आनंदी व उत्साही वाटतात.

Read more

आणि आमच्या हक्काच्या वर्गखोलीत पुन्हा एकदा ऐकू आला चिमुकल्यांचा आवाज (असोला)

– कांचन देवळे

गेल्या काही वर्षापासून बेड्यावर अंगणवाडी आहे. ही अंगणवाडी म्हणजे किरायाने घेतलेली एक खोली.  मात्र कधी-कधीच उघडणारी. जेव्हा अंगणवाडी सेविका काही कामास येत असेल तेव्हाच. म्हणजेच मुले आणि अंगणवाडी याचा काहीही संबंध नाही.

त्यामुळे तेथील  लहान मुले दिवसभर इकडे तिकडे खेळत असणे हाच उपक्रम होता.  याचा परिणाम असा की जेव्हा ही लहान मुलं पहिलीत जातात तेव्हा त्यांचा शाळा पूर्व तयारी म्हणजेच सूक्ष्म विकासाबाबत प्रश्न पडतो. पहिल्या वर्गात शिकायला सुद्धा त्यांना खूप त्रास होतो त्याचा परिणाम म्हणून लहान मुले मग शाळेत जायला नकार देतात. यावर्षी आम्ही पूर्व-प्राथमिक गटाचा एक वेगळा वर्ग घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीला तिथे बसण्याची जागा उपलब्ध नव्हती. लहान मुलं जास्त वेळ खुल्या जागेत बसत नव्हती. ही समस्या आम्ही समुदायातल्या मोठ्या लोकांना सांगितली, त्यांनी काही दिवस या गोष्टीवर विचार केला. नंतर समुदायातील एक घर तिथे रिकामे होते. त्या घरमालकाने आणि समुदायातील मोठ्या व्यक्तींनी चर्चा करून आम्हाला शिकवण्यासाठी ते घर उपलब्ध करून दिले. त्यांनतर तिथे अंगणवाडी चा वर्ग चालू करण्यात आला. समुदायातील लोकांनी दिलेल्या खोलीला व्यवस्थित साफ करून मुलांना लागणारे शैक्षणिक साहित्य जसे, फुलाची, रंगांची माहिती देणारे चार्ट्स ,अंकांची ओळख होण्यासाठी तयार केलेले कार्ड्स, बडबड गीतांची चार्ट्स अशी वेगवेगळी साधने वर्गखोलीत ठेवण्यात आले. जेव्हा वर्ग चालू झाला त्यावेळी मुलं यायला खूप कंटाळा करायची कारण त्यांना शाळेत जाण्याची सवय नव्हती. काही दिवस त्यांना आणण्यात आणि तिथे बसवण्यात खूप त्रास झाला, पण दोन-तीन दिवस गेले मुले तिथे थोडेफार बसत होते, नंतर ते उठून चालले जायचे. त्या दोन-तीन दिवसांमध्ये ते ज्या साधनांसोबत किंवा इतर वस्तूंसोबत खेळत होते त्यांना ते खूप आवडायला लागले आणि क्लासरूम मधले चित्र बघून ते आपल्या भाषेत आपसातच बोलायचे. खेळण्याच्या काही वस्तू तिथे होत्या, त्या त्यांना हाताळायला खूप आवडत होते आणि मज्जा येत होती. आता त्यांना एकदा आवाज दिला की लगेच वर्गात येऊन बसतात. आता तिथले पालकही स्वतःहून तिथे त्यांना सोडून जातात. यामुळे आता लहान मुलांना पुढे शिकण्यास त्रास होणार नाही.

Read more

बालसभा (UPAY Community Learning Centre)

– निधी वासनिक

गेल्या एक आठवड्या पासून सेवाभाव म्हणून मुलांना सामाजिक जबाबदारी कळावी या उद्देशाने लहान लहान विषयांवर नाटकाद्वारे भाव समजावण्याची प्रॅक्टिस सुरू केली.

 त्यात असं होतं की, एक बस असेल आणि त्यात काही लोक बसलेले असतील. त्यातलाच एक व्यक्ति आधी चिप्स खाणार, पाणी पिणार व  पाण्याची बाटली आणि चिप्स चा पॅकेट तेथेच बस मधे फेकून देणार व त्याचा स्टॉप आला की तो व्यक्ति निघून जाईल.  मग बस मध्ये बसलेला एक चांगला व्यक्ति तो कचरा उचलेल. त्या नंतर पुढे एक म्हातारी आजीबाई येणार आणि बस मध्ये  बसलेला एक व्यक्ति स्वतः उठून तिला जागा देणार आणि स्वतः उभा राहील राहील. बस मध्ये असेच प्रत्येक स्टॉप वर एक वेगवेगळी अडचण असणारी व्यक्ती येणार. उदाहरणार्थ पायाने जखमी असलेला,  आंधळा व्यक्ति, गरोदर बाई, लहान बाळ जवळ असलेली बाई इत्यादी आणि त्यांना बसायला प्रत्येक वेळी कोणी ना कोणी स्वतः उभं राहून जागा देणार. असं आहे सेवाभावाचं स्वरूप.अशी ही तयारी सुरु होती पण मधेच अस झालं की प्रत्येक वेळा मुलांची भूमिका बदलत गेली याच कारण अस की मुलं आजारी पडत गेली आणि सेंटर ला येऊ शकली नाही, त्यात त्यांचे डोळे येणं ही साथ पसरली आणि त्यामुळे त्यांना सेंटर ला यायला काही दिवस बंद करून ठेवले. मग काय रोज नवीन मुलांच्या भूमिका बदलल्या त्यात प्रॅक्टिस काही झालीच नाही. मग काय प्रोग्राम च्या दिवशी काळजी वाटली. कारण प्रॅक्टिस झालेली नव्हती आणि ज्यांची झाली ते आजारी होत. यंदा आम्ही हताश झालो होतो.  कार्यक्रम कसा होईल हा मोठा प्रश्न होता.  ठरविल्या प्रमाणे आमंत्रण गेलेले होते, पाहुणे आलीत मग सेवाभाव चा कार्यक्रम करावाच लागला.  पण यंदा प्रॅक्टिस न करता फक्त तोंडी स्वरुपात सांगून जोड्या बनवून दिल्या आणि त्यानुसार मुलांनी मूकनाट्य केल. बराच गोंधळ सुरुवातीला झाला पण नंतर मात्र मुलांना समजताच त्यांनी ते स्वतः कौतुक वाटेल असे केले. ज्या कार्यक्रमाबद्दल हताश होतो तो मुलांनी व्यवस्थित रित्या पार पाडला.

Read more

 Learning companions ने भरवाड़ समुदाय मध्ये सहाव्या लर्निंग सेण्टर चा पाया रुजवला (बोथली)

– प्रतीक्षा पाखले

जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच बेड्यावर मुलांना शिकवण्यासाठी तसेच समदुायासोबत ओळख करून घेण्यासाठी मला आणि जनकला बेड्यावर पाठवण्यात आले होते

.जनक तिथली  रहिवाशी असल्यामुळे स्वतःची ओळख बेड्यावरील लोकांना पटवनू देण्याची तिला गरज नव्हती.  परंतु मला मात्र यावर भर द्यावा लागला. दामिनी ताईंनी पहिल्या दिवशी समदुायातील लोकांना कामाबद्दल व मुलाचा  शिक्षणाबद्दल तशी ओळख पटवनू दिलीच होती. त्याचबरोबर मुलाचा ऍडमिशन विषयी सुद्धा सांगितले होते.  परंतु त्यानंतर जबाबदारी माझी आणि जनकची होती. मुलांची ॲडमिशन करून घेण्यासाठी तसा काही फार त्रास नाही झाला दोन दिवसात बेड्यावरील शिक्षणास पात्र सर्व मुलांच्या ऍडमिशन आम्हाला मिळाल्या त्या गोष्टीचा आनदं तर आम्हाला होताच, पण त्याचबरोबर मुलाच्या ऍडमिशन नंतर मुलांना शिकवायचे कुठे? या आधी समदुायातील लोकांना मुलांच्या शाळेसाठी झोपडी बांधायची आहे याची कल्पना दिलीच होती. पण समुदायातील लोक नुकतेच स्थलांतरावरून बेड्यावर येऊ लागली होती व त्यांच्या स्वतःला राहण्यासाठी झोपडी बांधण्याचे काम चालू होते. त्यात शाळेची झोपडी बांधनू मागने हे थोडे अवघड होते. आमचा भय्यांना रोजचा एकच प्रश्न “भैया स्कूल के लिए झोपडी कब बनायगें?” आणि त्यावर त्यांचे उत्तर “हमारे घर के झोपडी का काम होने के बाद”.  झोपडी तयार होईपर्यंत मुलांना कुठे शिकवायचे यावर दामिनी ताईंनी एक उपाय सुचवला, “गावातील अगंणवाडी आणि शाळा जास्त दूर नाही तर तुम्ही मुलांना तेथे घेऊन जाऊ शकता काय”? आम्हाला पण ही बाब पटली. आम्ही मुलांना तयार करून अंगणवाडी व शाळेत घेऊन जात होतो. पण मुलांना शिकवण्याचे समाधान मात्र आम्हाला मिळत नव्हते. कारण तिथे आम्ही ठरवलेली उद्देश काही यशस्वी होत नव्हते. तिथे शिकवण्याचा आनदं ही काही वाटत नव्हता. शिक्षकांनी जे काम सांगितले ते कामे करायची आणि बसून राहायचे. असे तिथे होत होते. मी आणि जनक आमच्या शाळेच्या झोपडी बांधण्याची वाटच पाहत होतो. अचानक व्हॅटसअप ग्रुप ला एक फोटो आला. बारा दिवसानंतर तो सोनेरी दिवस उगवला. आमच्या शाळेची झोपडी तयार झाली.  शेवटी आम्हाला व आमच्या मुलांना हक्काची वर्गखोली मिळाली.

Read more

गोष्ट मुलाच्या पुढाकार घेण्याची  ( ठणठण )

पायल गहाणे

  एके दिवशी आम्ही दुपारच्या वेळेस मंजूदीदीच्या घरी जेवण करायला बसलो होतो , तेव्हा आम्ही तिघेही शाळेचा लागू झालेल्या ऍडमिशन फीस बद्दल बोलत होतो , बेड्यावर फीज म्हटल्यावर सगळे लोक फीजला होकार देतील का ही शंका होती कारण एका घरी चार मुलं प्रायमरी चे आहेत तर ते दर महिन्याचे आठशे रुपये देतील का,

असं सगळं संभाषण आमचं जेवण करताना सुरू होतं .शाळा सुरू होऊन नुकतेच आठ दिवस झाले होते आणि शाळा बांधून लवकर व्हावी यासाठी सातत्याने आमचे प्रयत्न सुरू होते  तर मग आम्ही तिघांनी मिळून विचार केला की झोपडी तर बांधयला वेळ आहे  तर आपण ऍडमिशन  घ्यायला सुरूवात करायची. असा पद्धतीने आम्ही मंजुदीदी घरून ऍडमिशन करायला सुरु केले . तेव्हा राधा मंजूदीदी ची मुलगी तिला अम्हि बाकी मुलाची नावे लिहायला सांगितली आणि सेजल स्वतःच पैसे गोळा करायला आणि आम्ही कश्यासाठी पैसे गोळा करत आहोत यासाठी आम्ही तिला समजून सांगितलं तसेच राधा सुद्धा सर्व घरी सांगायला सुरुवात केली असच तिने स्वतःच्या घरी आपल्या आईंबाबांना गुजराती मध्ये स्टोरी सांगत होती तर तिचा लहान भाऊ तिच्याकडे बघत होता आणि तो पण आमच्या सोबत जुळला त्यानंतर राधा ने जसूदीदीकडे स्टोरी सांगायला सुरवात केली गुजराती, मराठी भाषेमध्ये स्टोरी सांगायला सुरुवात केली समजून सांगत असताना जसूदीदी तिच्याकडे खूप कुतूहलाने बघत होती आणि बाकीच्या अन्य मुली सुद्धा तिच्याकडे  बघत होत्या तर त्यांच्या घरापासून आमच्याकडे पुन्हा पाच ते सहा मुलं, मुली  आमच्यासोबत  ऍडमिशन घेण्यासाठी आमच्यासोबत जुळले गेले असं करता करता आम्ही रेखाच्या घरापर्यंत पोहोचलो तर रेखाला चांगलं वाटलं की सेजल स्टोरी सांगत आहे आणि राधी लिहल आहे तर ती पण आमच्यासोबत आली असं वीस ते पंचवीस मुलमुली मिळून आम्ही घरोघरी एडमिशन साठी फिरत होतो.  तेव्हाच एक कान्हा नावाचा मुलगा आमच्यासोबत जुळला आणि दोन ते तीन घर झाल्यानंतर रेखा आणि कान्हा आम्ही पण  स्टोरी सांगतो आम्ही पण लिहितो असं त्यांनी म्हटलं आणि काही वेळानंतर त्यांनी स्टोरी सांगायला आणि लिहायला सुरुवात केली दोन-तीन घर समोर गेलो तेव्हा कान्हा लिहत होता. तेव्हा कान्हाला अनुस्वार जोडाक्षरे लिहिता येत नव्हतं तर त्याच्यावर काही लोक हसायचे गुजराती मध्ये शिव्या घालायची तेव्हा कान्हा थोडा डगमगला ,घाबरला आणि निराश होऊन एका जागेवर जाऊन बसला.तेव्हा सगळे आम्ही त्याच्याजवळ जाऊन त्याला समजवलं की तु बाहेर गायींच्या माघे भिरत होतास, तरी तू तुझा अभ्यास बंद नाही ठेवलास तू वाचायचं त्यामुळे तुला किती सुंदर लिहिता वाचता येते. तिथे बोलणाऱ्या लोकांना  पण समजवण्याचा प्रयत्न केला की तो मोबाईल वर बघून शिकत होत त्यामुळे त्याला लिहिता वाचता येते कान्हा ला है ऐकून बर वाटलं तो पुन्हा उठला आणि लिहायला सुरुवात केलं अस करता करता आम्ही संध्याकाळचे सात वाजेपर्यंत एडमिशन जमा केले. असं करता करता आमच्या कडे 34 एडमिशन त्या दिवशी पूर्ण झाल्या आणि हे सगळं काही मुलांमुळे खूप सोपं झालं.

Read more

Our Partners & Supporters

geo
pmnifold
fmf
excel
avart
aaa
Untitled
cpc
tfix
persistent-systems-header-logo

Leave a Reply

Your email address will not be published.