Photo Bulletin December 2024

संकलन आणि संपादन  – निकिता देवासे

ठणठण – स्कूल चले हम

पल्लवी शंभरकर 

आमचा ठणठण बेडा स्थलांतर होऊन आम्ही खेडीला येऊन काहीच दिवस झाले होते. बेडयावर वेगेवेगळ्या लेवल ची खूप मुले आहेत. त्यातच स्थलांतर झाल्यावर मोठ्या वयाची पण जी मुले अगोदर शाळेत जायची त्यांचे नव्या ठिकाणी शाळेत जाणे बंद होते.

त्यामुळे तीही सर्व मुले आमच्या लर्निंग सेंटरलाच येऊ लागली. आम्हाला प्रश्न पडला होता की आता मुलांना शिकवायचे कसे? म्हणून आम्ही मोठ्या मुलांच्या ऍडमिशनसाठी नव्या ठिकाणच्या शाळेत शिक्षकांसोबत  बोलायला गेलो. सुरुवातीला तर शिक्षकांनी आम्हाला साफ नकार दिला. सर म्हणाले की ही मुले रोज येत नाहीत, त्यामुळे आम्ही त्यांना शाळेत घेऊ शकत नाही. त्यानंतर मुले रोज शाळेत येतील याची खात्री दिल्यानंतर प्रिंसिपल सर बोलले की मुले शाळेत येतील, बसतील, पण आम्ही त्यांना शिकवणार नाही. आम्ही फक्त आमच्या मुलांनाच शिकवणार. यावर मला काहीच सुचत नव्हते. मन अस्वस्थ झाले होते. 

आम्ही शाळेतून परत आलो. आम्ही पालक सभा आयोजित करायचे ठरविले. पालकांसोबत एक तास मुले  शाळेत जायला पाहिजे यावर चर्चा झाली. शुक्रवार ला सकाळी सरांना कॉल केला आणि त्यांना मुलांना शाळेत प्रवेश द्या यावर बोलणे केले. त्यावर त्यांनी नकार दिला त्यानंतर त्यांना कन्वेंस करणे सुरू होते. नंतर त्यांनी केंद्र प्रमुख यांच्याशी संपर्क करायला  लावले.  त्यानंतर मी ‘चोपकर सर’ सोबत बोलले आणि त्यांना पूर्ण परिस्थिती समजावून सांगितली. त्यांनी आम्हाला मुले  घेऊन शाळेत जाण्याची परवानगी दिली. 

शेवटी शाळेत जाण्याचा दिवस उजाडला. जी मोठी मुले होती ती आता पाचवी किंवा वरच्या वर्गामध्ये जायला लागली. त्या मुलांना बघून लहान मुले प्रेरित झाली. जेव्हा मोठ्या मुलांना शाळेत न्यायचे होते, त्यावेळेस लहान मुले पण शाळा बघण्यासाठी येतो म्हणाले. जेव्हा मुलांनी शाळा बघितली, भिंतीला असलेली चित्रे, आजूबाजूचा परिसर, क्लास मध्ये असलेले structure बघून लहान मुलांना माझ्या सोबत शाळेतून परत यायची इच्छा नव्हती. ती बोलत होती, “मॅडम हम नहीं आते,” आणि मुलांमध्ये शाळेत जायची उत्सुकता आणि  इच्छा निर्माण झालेली दिसत होती.  

ही सर्व सकाळपासूनची धावपळ होती, पण त्यातून जो आनंद मिळाला तो खूप सुखदायक होता. पुन्हा आनंद देणारी गोष्ट म्हणजे लक्ष्मण भैयाच्या तिन्ही पण मुली सकाळी स्कूलमध्ये जायला तयार झाल्या. त्यांना बघून वसंतनी पण शाळेचा  रस्ता पकडला. नंतर काय तर आश्चर्यच. सोमवारला जेव्हा आम्ही बेड्यावर आलो तर बेड्यावरील सर्व मुली शाळेत गेलेल्या होत्या.

Read more

बोथली – मैं काका-काकी के साथ रहूंगी, मुझे पढ़ाई नहीं छोड़नी 

प्रतीक्षा पखाले

रितु को पढ़ाते हुए अभी मुझे एक साल पूरा हो गया है। पिछले साल की रितु और अब की रितु इसमें बहुत बदलाव देखने को मिल रहा है।

जैसेही  हमारे बेड़े के आसपास के जंगल का चारा खतम होता है, वैसे यहाँ के बहुत से परिवार स्थलांतर के लिए निकल पड़ते हैं। उनमें रितु का भी परिवार शामिल है। पिछले साल रितु दूसरी कक्षा में थी और बेड़े पर बच्चों को पढ़ाने का वह मेरा पहला साल था। रितु जब कक्षा में आने लगी तो बड़ी चंचल, शरारती थी और किसी की बात नहीं सुनती थी। पढ़ाई में उसकी रुची बढ़ाने के लिए मुजे थोड़ा वक्त लगा।  क्योंकि उसे समझना मेरे लिए भी नया और कठिन था। मैं उसे पढ़ाने के लिए नए नए तरीके ढुँडने लगी। उसे अच्छे से पढ़ाने का प्रयास करने लगी। धीरे धीरे वह भी अब एक जगह अच्छे से बैठने लगी। जो पढ़ती थी वह समझने लगी। तभी बेड़े का स्थलांतर करने का समय पास आ गया और रितु भी अपने परिवार के साथ चली गई। इस दरम्यान रितु थोड़ा बहुत कुछ सीखी थी वह भी भूलने लगी। परिवार के साथ जाने के बाद अभी रितु की पढ़ाई पूरी तरह से छूट गई थी। 

इस साल की कहानी कुछ और है! जब बरसात का मौसम आया तो सब परिवार बेड़ेपर वापस आए। यह साल अब रितु रोज स्कूल मे आने लगी। धीरे-धीरे वह अब पढ़ना सिख रही है। उसके आत्मविश्वास के कारण उसने जल्द ही पढ़ाई मे रुचि बढ़ा ली है। इसबार बेड़े स्थलांतरित हुए, लेकीन रितु अपने परिवार के साथ नहीं गई। उसने अपने माँ से कहा, “पिछले साल बेड़े के साथ गई तो मेरी बहुत सारी पढ़ाई छूट गई। इस बार मैं काका-काकी के पास रहना चाहती हूँ। आज रितु अपने लेवल के बच्चों के साथ पढ़ाई मे आगे बढ़ रही है। पिछले साल वाली रितु और इस साल वाली रितु का पढ़ाई के लिए हुए बदलाव को  देखकर मुझे वाकई बहुत अच्छा लगता है।

Read more

पुन्हा एकदा रियाजघर

निधी वासनिक, निकिता देवासे 

चौथ्या वर्गानंतर च्या मुलांना त्यांच्या आवडीच्या विषयात सखोल अनुभव आणि प्रशिक्षण घेण्यासाठी भरपूर वेळ मिळावा, हा रियाझघर कार्यशाळांचा एक महत्वाचा उद्देश.

या महिन्यात पहिल्यांदा अशा विषय विशेष रियाजघर कार्यशाळांचा pilot (प्रयोगात्मक उपक्रम) आम्ही करतोय. विषय विशेष कार्यशाळा कशी चालेल यासोबतच अजून एक महत्वाचा प्रयोग होता की प्रत्यक्ष बेड्यावर, समुदायाच्या मदतीने रियाजघर कार्यशाळा केली तर कशी होईल? यशस्वी होईल का? यावेळेचा विषय विशेष होता, “इंग्रजी”. मुलांमध्ये इंग्लिश या विषयाची आवड निर्माण करायची होती. हा पूर्ण सहा दिवसाचा वर्कशॉप होता. मुलांसोबत जे सेशन घ्यायचे होते, त्याची आम्ही प्लॅनिंग केलेली होती.

रियाजघरचा पहिला दिवस उजडला. रियाजघर बेड्यावरील एका झोपडीमध्ये घेण्यात आले होते. या झोपडीमध्ये आम्ही मुलांसाठी छान handmade tools, posters, worksheets ठेवले होते. दिवसाची सुरुवात ‘हीच आमुचि प्रार्थना’ या गीताने झाली. प्रार्थनेतून छान ऊर्जा निर्माण झाली होती आणि त्या तारेच्या व ताडपत्रीच्या झोपडीलाही जिवंतपणा प्राप्त झाला. पहिल्या दिवशी आम्हाला मुलांना ultimate phonics या पुस्तकातून phonics च्या पायाभूत गोष्टी शिकवायच्या होत्या. मुलांची इंग्रजी शब्दसंपत्ती वाढवायची होती. मुलांना इंग्लिश स्वरांचा खेळ शिकवला. प म्हणजे p, ब म्हणजे b, ट म्हणजे t ही संकल्पना शिकवली. त्यांचे  छान स्वरांचे  खेळ घेतले. मुलांना लागणारी शब्दकार्डे, पुस्तक-चित्रे, स्वाध्याय-साहित्य आम्ही त्यांना उपलब्ध करून दिले. त्यांच्या मनोरंजनासाठी आणि त्यातून शिकता  येईल असे अनेक  खेळ शिकवले. 

प्रत्येक दिवशी आम्ही मुलांना काहीतरी नविन शिकवण्याचा प्रयत्न करत होतो. ज्या apps नी मुलांना इंग्लिश शिकता येईल अशा apps introduce करून दिले. मुलांना कंटाळवाने वाटू नये म्हणून त्यांना आम्ही या वर्कशॉपच्या दरम्यान adventure साठी नदी पाहायला नेले. शब्द-कार्ड चे नवनवीन खेळ मुलांसोबत घेतले. आणि मुलेही या मध्ये छान उत्सुकता दाखवत होते. वर्कशॉप मुळे मुलांमध्ये इंग्रजी शिकण्यासाठी त्यांचा आत्मविश्वास दिसून येत होता. हे सर्व बघून खूप छान वाटले.

Read more

असोलाArtReach team मुळे मिळाली मुलांच्या कला-कौशल्ये आणि भावनांना अभिव्यक्त होण्याची संधी

आदित्य कोल्हे 

 

Artreach India ही संस्था आहे जी मुलांसोबत कलेच्या माध्यमातून शिक्षणाचे काम करते. असाच एक प्रयोग त्यांनी आमच्या असोला बेड्यातील मुलांसोबत केला. त्यात तीन दिवसीय कार्यशाळा घेतली.

Artreach India च्या दिव्या, तिलोत्तमा आणि आरती यांनी पूर्ण कार्यशाळेचे नियोजन केले होते. तीन दिवसीय कार्यशाळेत 30 मुलांनी भाग घेतला होता. 

Artreach  workshop चा पहिला दिवस हा मुलांसाठी रोजच्या क्लासपेक्षा खूप वेगळा होता. या कार्यशाळेत त्यांना खुप काही आवडणाऱ्या गोष्टी करता आल्या. त्यांनी सुरुवातीला पेपर्स पासुन पपेट तयार केले. मुलं सांगितल्याप्रमाणे करत होती. काही तरी खुप छान तयार होत आहे, आणि मी हे तयार केले हे बघून, Art ची मॉजिक बघून मुलांना खूप आनंद होत होता.  

दुसऱ्या दिवशी मुलांची उत्सुकता अजून जास्त दिसुन आली. प्रत्येक मुलाला सिल्व्हर कागद देण्यात आला होता. आणि त्यांना एक पपेट (बाहुला) तयार करायचे होते. आणि ते तयार झाले की त्याचा ड्रेस पण तयार करायचा होता. जे पपेट मुलांनी तयार केले ते मुलांच्या कल्पनेतील कॅरेक्टर/पात्र/व्यक्ती असणार होते. मुलांनी सुंदर असे कॅरेक्टर तयार केले. त्यांची नावे मुलांनी ठरवली. नंतर मुलांनी जे कॅरेक्टर तयार केले त्याच्या भोवती एका story बनवण्याची वेळ आली. एकुण 20 मुलांचे 4 गट तयार झाले.  प्रत्येक गटात 5 मुले होती. प्रत्येक गटाला एक theme मिळाली. ‘दोस्ती’, ‘खेल’ आणि ‘मदत’ या तीन शब्दांच्या भोवती मुलांना गटांमध्ये गोष्ट तयार करायची होती. मुलांच्या गोष्टी तयार झाल्या. आणि त्या गोष्टी मुलांनी पेपर वर रेखाटल्या. प्रत्येक गटाची एक वेगळी story  तयार झाली.  मुलांंना काहीतरी विलक्षण करायला मिळाले होते. मुलांसाठी हा एक वेगळा अनुभव  होता. तिसरा दिवस मुलांसाठी adventure चा होता. नागपूर येथील VR Mall ला नेण्यात आले. पहिल्यांदाच मुलांनी इतका मोठा मॉल बघितला. नंतर मुलांनी आपआपल्या गटांमध्ये स्टोरी present केली. नंतर पूर्ण मॉल बघितला. हा सर्व अनुभव मुलांसाठी खूप रोमांचक होता.

Read more

सोनखांबतेजल ची चार महिन्यातील झेप

प्रितम नेहारे

गेल्या काही महिन्यापासून सतत घेतलेल्या परिश्रमाचे फलित या काही दिवसात दिसत होते आणि ते पाहून मला खूप मस्त वाटले. मुलांमध्ये होणारा बदल, त्यांच्या हस्ताक्षरांमध्ये होणारे सुधार आणि वाचनामध्ये झपाट्याने होणारी प्रगती, याचे एक अनोखे जग मी बघायला सुरुवात केली.

जसजसे मुले स्वतःहून काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करत आहे, तसे त्यांच्या मध्ये होणारा बदल मला दिसून येत आहे. चार महिन्याच्या प्रवासात दिवसागणिक मला नव-नवीन अनुभव येत आहेत. 

त्याचपैकी एक अनुभव म्हणजे आजची गोष्ट. मी मोठ्या वर्गाच्या मुलांना काही शब्द देऊन निबंध लिहायला दिले होते. सर्वच मुले लक्ष केंद्रित करून लिहीत होती. त्यात दुसऱ्या वर्गाची तेजल सुद्धा होती. मी तिची वही बघितली  तर त्यात माझ्या नावाने लिहिलेली काही वाक्ये  होती. तिच्या लिहिलेल्या शब्दांमध्ये थोड्याफार चुका होत्या, पण मी त्या चुका न बघता त्यातील जेमतेम दुसऱ्या वर्गातील मुलीची समज, सुंदरता आणि दृष्टिकोन बघत होतो. ती स्वतःला, स्वतःच्या कुटुंबाला, स्वतःच्या कामाला,  स्वतःच्या शिक्षणाला किती महत्त्व देत आहे ते त्यातून दिसत होते. तिची कल्पनाशक्ति वाढताना दिसत होती. ज्या मुलीला आपण चार महिन्यापासून शिकवत आहोत, त्या मुलीमध्ये आज इतका बदल दिसत होता. जी मुलगी सरळ शब्दावर होती, आता त्याच मुलीला काना, मात्रा, वेलांटीची वाक्ये नुसती वाचताच नाही तर लिहिताही येत आहेत, ही माझ्यासाठी खूप नवलाची आणि मोठी गोष्ट आहे. हळूहळू सर्वच मुलांमध्ये असाच बदल व्हावा हीच माझी इच्छा आहे. 

Read more

चक्रीघाट – शाळा तोडताना

कोमल गौतम, पल्लवी दोडके 

काहीच दिवसात बेड्याचे स्थलांतर होणार होते. त्याआधी आम्हाला मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही तयार केलेली झोपडी काढायची होती. जितके चॅलेंजेस आम्हाला झोपडी बांधायला आले, तेवढेच झोपडी काढताना सुद्धा आले. झोपडी काढण्यासाठी आम्ही कम्यूनिटीला मदत मागत होतो.

पण त्यांच्याकडेही वेळ नसल्यामुळे ते आम्हाला मदत करू शकत नव्हते. झोपडी काढण्याच्या काही दिवस आधी आम्ही त्यांना विचारत् होतो, “हमारा बेडा कब जाने वाला है?” पण ते आम्हाला काहीच नेमकं सांगू शकत नव्हते. आणि झोपडी व्यवस्थितपणे काढणे आमच्यासाठी महत्वाचे होते. कारण मागल्या वर्षी आम्ही कल्पना केली त्याच्या खूप आधीच अचानक बेडेकरी स्थलांतर झाले होते आणि आमची झोपडी तशीच राहून गेली होती. अचानक आलेल्या पावसाने आमच्या झोपडीचे खूप नुकसान झाले होते. आम्ही जे मुलांना शिकवण्यासाठी टूल्स, पोस्टर बनविले होते त्याची वाईट अवस्था झाली होती. पावसाने काही वस्तूही पूर्ण खराब झाल्या होत्या. यामुळे आम्हाला खूप त्रास झाला. या वर्षी तसे व्हायला नको म्हणून वेळेत झोपडी काढायचे ठरवले. झोपडी काढताना खूप वाईट वाटत होते. झोपडी बनवायलाच खूप उशीर झाला होता आणि ती बनता बनता दीड महिन्याचा वेळ निघून गेला होता. मुलांच्या मदतीने जंगलात जाऊन लाकूड आणणे, झोपडीत गार करणे (शेणाने सारवणे) ही कामे केली होती. देणगी मागून आम्ही झोपडीत लागणाऱ्या वस्तु आणल्या होत्या. वेळेवर मुलांसाठी टुल्स तयार केले होते. मुलांकडून छान पोस्टर्स बनवुन घेतले होते. हे सर्व करून आम्ही मुलांचे वर्ग घेत होतो. समुदायाने सुद्धा आम्हाला ही झोपडी बांधण्यास मदत केली होती. आणि आम्ही तिथे फक्त चारच महिने मुलांना शिकवू शकलो. या सर्व गोष्टी मनामध्ये फिरत होत्या आणि मनाला अस्वस्थ करत होत्या. एका दिवसात ते सर्व मोडून नव्याने वेगळ्या परिस्थितीत शिक्षण सुरु ठेवण्याची तयारी करायची होती. 

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *