हातात गाईची दोर, सोबत शिक्षणाची ओढ!
हातात गाईची दोर, सोबत शिक्षणाची ओढ!

हातात गाईची दोर, सोबत शिक्षणाची ओढ!

अस्मिता बैलमारे, विक्रांत भगत, कल्याणी माहुरक

दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर विक्रांत ,अस्मिता आणि कल्याणी बेड्यावर वर्ग घ्यायला गेले होते. त्यांना बेड्यावरचे अचानक बदललेले चित्र पाहून धक्काच बसला. कम्युनिटीमधील  लोकांच्या मदतीने निर्माण केलेली शाळा त्यांना दिसेनासी झाली. सर्व लहान-मोठी मुले त्यांच्या आईला बैलबंडीमध्ये सामान भरण्यासाठी मदत करत होते. समुदायातील लोकांचे स्थलांतर काही महिन्याने गायींच्या चाऱ्याच्या शोधात होणार हे माहिती होत. मात्र येवढ्या लवकर होणार याची कल्पना पण केली नव्हती. या नवीन बेड्यावर काही दिवसाआधीच मुलांचे शिक्षण सुरू झाले होते. मुले शिकण्याच्या प्रवाहात आले होते. आता अचानक होणारे कम्युनिटीचे स्थलांतर मुलांच्या शिक्षणावर खूप परिणाम करणार होते. यासंबंधी अस्मिता जेव्हा बेड्यावर स्त्रियांसोबत बोलली तेव्हा असे समजले की, आता बेड्यावर थांबणे खरंच अशक्य झालं होतं. बेड्याच्या समोर असलेल्या मिलमधून खूप जास्त धूर निघायचा आणि तो गाई- वासरांच्या पोटात जायचा, त्यामुळे गायी-वासरे मृत्यूमुखी पडत होते.

मुलांचे शिक्षण थांबू नये म्हणून  तिघांनीही बेड्यावरील लोकांसोबत स्थलांतर करून शिक्षण सुरु ठेवण्याचा निर्णय घेतल. कम्युनिटी जिथे- जिथे  स्थलांतरित झाली, तिथे ते मुलांना शिकवत होते. गंगा ही साडेतीन वर्षाची घरातील लहान मुलगी. तिला पाच बहिणी आणि एक भाऊ आहे. मोठी बहीण लहान भावंडांना सांभाळून घरची कामे करते, आणि अस्मिताकडे शिकायला येते. त्या दिवशी तिघेही मुलांना शिकवायला  गेले होते. त्यांना दिसले की, गंगा झोपडीमध्ये कांदे कापत होती. तेवढ्यातच  घरचे बैल चरून आले. गंगाने बैलाचा दोर पकडला आणि त्यांना ओढत-ओढत खुंट्याला बांधत होती. येवढ्या लहान वयात बैलांना चरायला सोडणे, ते वापस आल्यावर त्यांना खुंट्याला बांधने ही जबाबदारी ती एकटी पूर्ण करत होती.

गंगाच्या वयात जेव्हा मुले असतात तेव्हा त्यांना खेळणे आणि जेवणे याव्यतिरिक्त काहीच दिसत नसते. परंतु, बेडयाच्या स्थलांतरामध्ये गंगासारख्या कितीतरी लहान-लहान मुली त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करत होत्या. परिस्थिती माणसाला कसं घडविते, हे त्यादिवशी जवळून दिसले.

One comment

Leave a Reply

Your email address will not be published.