हा कधी शिकला?
हा कधी शिकला?

हा कधी शिकला?

अस्मिता बैलमारे

आज मला या लेकराला बघून फार आनंद झाला. याचं नाव विक्रम ( पण तो स्वतःला गणेश म्हणतो) 😅 आधी मला वाटायचं की याला मी जे बोलते ते कळत नसेल. मी वर्गात घेत असलेल्या एक्टिविटी/पाठ यामध्ये प्रत्यक्ष सहभागी देखील व्हायचा नाही. त्याची समजुन घेण्याची प्रक्रिया खूप संथ गतीने चालणारी वाटायची. विक्रम ला घेऊन सर्वांचे निरीक्षण देखील काही असेच होते. त्यामुळे या मुलासोबत मी फार आरामात बसून याला समजुन घेण्याचा प्रयत्न करायचे.
पण आज विक्रम ने मला आश्चर्यात टाकलं. माझ्यासाठी हा आश्चर्याचा, फार सुखद आणि आनंदाचा क्षण होता. हे कसं घडलं असेल याविषयी डोळ्यांसमोर प्रश्न चिन्हंच उभं होतं! काही दिवसापूर्वी मी क्लासमध्ये बेरजेची concept काही वस्तू वापरून आणि त्या एकत्र केलं तर कस वाढतं जात हे शिकवत असताना त्याने माझं पुर्णपणे observation केलं असावं आणि आज जेव्हा मी त्याला बेरीज ची concept शिकवायला घेतली तर त्याने मला त्याच्याविषयी वेगळा विचार करायला भाग पाडलं.
त्याने ज्याप्रमाणे मी काड्या , दगड , पाने एकत्र करून मोजून दाखवायचे अगदी तसंच (जरी त्याच्याकडे काड्या , दगड , पाने नसली तरी) त्या worksheet वर एकही step न चुकता तशीच process विक्रम ने केली आणि मला न चुकता मिळवण्याची गणितं करून दाखविले. मला फार आनंद झाला. सोबतच त्याच फार कौतुक देखील. हे फक्त त्याने गणितं करून दाखवलं या विषयी नसून त्याने माझी समज मोडून काढली. आपण सतत म्हणत असतो की , “मुलं मोठ्यांचे निरिक्षण करून शिकतात “यावर माझा अजून विश्र्वास पक्का झाला.
Thank you Vikram for being my child ( student ) ☺️

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *