Photo Bulletin: October 2023
Photo Bulletin: October 2023

Photo Bulletin: October 2023

संकलन आणि संपादन – जान्हवी काळे

वर्गात अर्थपूर्ण वाचनाचा मज्जेशीर सराव सुरु आहे(ठणठण)

पायल , अंजली , प्रशांत

बुधवारी वर्ग निरीक्षण,गृहभेटी आणि खूप साऱ्या गप्पा मारायला गणेश दादाची बेड्यावर भेट होती. या प्रसंगी बरेच असे अनुभव आले की जे अगदी मनात घर करून राहिले. [read_more id=”1″ more=”Read more” less=”Read less”]

गणेश दादा गृहभेटीला निघाला आणि तिकडे मुलांचे वाचनाचे सराव घेऊ लागला. ,त्त्यांनी मुलांना सांगितलं, “जो-जो मुझे पढ़कर दिखाएंगे उनको मेरी तरफ से एक ‘किताब दूंगा और वो ‘किताब फिर उसकी।” असं म्हणताच मुलं खुश. आणि दादाला वाचून दाखवायला लागली.मग पुस्तक तर देऊन दिलं पण त्या मागे अजून एक अट होती,पंधरा दिवसांनी दादा जेव्हा येईल तेव्हा ही पुस्तकं वाचून त्यात काय आहे हे दादाला सांगणं आणि सांगितलं तर दोन पुस्तक अजून तुम्हाला मिळतील आणि नाही वाचली तर त्या पुस्तकाची जेवढी किंमत तेवढी त्या-त्या मुलाला द्यावी लागेल.मुलांना अजून मज्जा आली आणि त्यांनी ही अट मंजूर केली आणि विश्वासानं आम्ही वाचू, असं म्हणाले . 

काही गृहभेटीचे अनुभव दादाने सांगितलेच होते, ते ऐकून आम्हाला ही खूप मज्जा आली. 

“हरेश छान वाचतो रे,” असं दादा म्हणला. हे ऐकून मुलांचं कौतुक वाटू लागलं. 

हे सगळ होत असताना आम्हाला इतक्या सगळ्या मुलांमध्ये प्रत्येक मुल थांबून बघणं कसं कठीण होत होतं हे जाणवत होतं आणि ते साहजिक आहे हे ही कळत होतं. म्हणून कोणी तरी नवीन दादा-ताई मध्ये-मध्ये  येऊन मुलांना विचारणं, त्यांच्याशी गप्पा करणं किती महत्वाचं आहे हेही कळलं होतं जे  खूप सुंदर आहे असं आम्हाला वाटलं. 

संध्याकाळ ७:३० वाजलेले होते. पायल ताई आणि मी भांडी घासत होतो. आणि आमच्या गप्पा ही छान रंगल्या होत्या. तेवढ्यात अजय चेहरा पाडून उदास असा आला आणि झोपडीच्या खांबावर येऊन खाली मान घालून बसला. हातात वही आणि पेंसिल घेऊन आला होता. मग आमच्या तिघांचा संवाद सुरु झाला.

पायल ताई आणि मी – क्या हुआ अजय? ऐसा मुँह क्यों उतरा है?

अजय – मुझे पढ़ना नहीं आ रहा है इसलिये मुझे लग रहा है की मैं मर ही  जाऊँ। 

पायल ताई आणि मी – (चिंता वाटली) अरे ऐसा क्यों बोल रहे हो? आपको सिखना है तो हम साथ में सीखेंगे। 

बैठो आप, हम आते हैं। 

पायल – आपको  ऐसा क्यों हो रहा है?

अजय – अभी गणेश सर के सामने सब पढ़ रहे थे, और मैं नहीं पढ़ पाया।,मेरी छोटी बेहेन भी मुझे पढ़ाने को बोलती है पर मैं उसको कुछ पढ़ा नहीं पा रहा हूँ ,क्यूँकि मुझे ही कुछ नहीं आ रहा है। मैं रोज रात को रोता हू और सो जाता हूँ।  पर अभी मुझको पढ़ना सिखना है। 

पायल – व्हेरी गुड बेटा, आपको खुद लग रहा है की आपको पढ़ना है, तो ये बहुत अच्छी बात है। . 

या सगळ्या संवादानंतर लगेचच अभ्यासाला बसण्याची तैयारी केली. लगेचच विशाल डोळ्यापुढे आला. कारण त्यालाही वाचण्यात अडचण जाणवत होतीच. स्वःतावर विश्वास वाटतं नव्हता. स्वतःला कमी लेखत असल्यामुळे पुढे येऊन वाचण्याचा प्रयत्न सुद्धा करत नव्हता .

विशालला ही असंच वाटतंय जसं अजयला वाटतं होतं. फक्त अजय ने ते बोलून दाखवलं, पण विशाल बोलत आला नाही. हे मात्र आम्हला त्या क्षणी कळल ,अस कळातच अजय ला विशाल च्या घरी जाऊन त्याला बोलून घेऊन ये असा म्हणलं,विशाल ला कळालं,त्या दोघांचा वर्ग होणार आहे आणि  त्याला खूप आनंद झाला आणि मग वर्ग सुरु झाला आणि त्यांना खूप मज्जा आली आणि त्या वर्गात आह्मी पूर्ण एक धडा वाचलाच नाही तर तो समजून पण घेतला त्या धड्याच्या निघडीत मुलाने आपले अनुभव पण छान जुळवून बोलते झाले. मुलांच्या चेहेऱ्यावर विश्वास दिसू लागलं त्यांचे चेहेरे प्रफुल्लित झाले होते आणि मग आह्मी सगळ्यांनी ठरवलं रोज रात्री आठ ते पंधरा दिवस तरी ८ ते ९ आपण असाच वर्ग घेऊयात .

आणि दुसऱ्या दिवशी मुलांनी कमाल केली बरोबर ,वर्गाच्या वेळच्या आत हजर होती. [/read_more]

बच्चों ने ली जिम्मेदारी (बोथली)

– प्रतीक्षा ,जनक

शाळेच्या बांधकामानंतर प्रथमच शाळेचे मैदान (ज्याला भारवाड समाजात गार करणे मानतात ) बेडे येथील महिलांनी रंगवले. त्यात आम्हीही त्याला मदत केली. पुढच्या महिन्यात जेव्हा शाळेच्या सेलिब्रेशनची वेळ आली तेव्हा या वेळी आम्ही मुलांसोबत मिळून शाळात साजरी करण्याचा विचार केला. पण नियमित वर्ग घेतल्यानंतर अभ्यासासाठी वेळच उरला नाही.[read_more id=”1″ more=”Read more” less=”Read less”]

त्यामुळे सुट्टीच्या दिवशी शाळेत जायचं ठरवलं. गणेश चतुर्थीची सुट्टी येणार होती. म्हणूनच सुट्टीच्या पहिल्या दिवशी आम्ही मुलांना विचारलं, “तुम्हाला उद्या सुट्टी आहे. पण आपल्या शाळा सुधारण्याची गरज आहे. आपण उद्या करू शकतो का? सर्व मुलांनी हे करण्यास होकार दिला. दुसऱ्या दिवशी आम्ही मुलांसह शाळेत पोहोचलो. पण तिथून पाणी आणि माती खूप दूर होती. मग आम्ही मुलांचे तीन गट केले. त्यात आम्हीही होतो. एका गटाला पाणी आणण्याची जबाबदारी दिली. दुसऱ्या गटाने माती आणि शेण आणण्याची जबाबदारी घेतली. गार करण्याची जबाबदारी तिसऱ्या गटाने घेतली. अशा प्रकारे आम्ही सर्वांनी आपापली कामे विभागली. कार्य पूर्ण होईपर्यंत सर्व लहान मुले, वृद्धांनी आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. अशा प्रकारे आमच्या शाळेचे खूप कौतुक झाले. मुलांच्या मदतीमुळे हे काम पूर्ण होऊ शकले. म्हणूनच आम्ही मुलांचे कौतुक केले. मुले ज्या प्रकारे आम्हाला मदत करत होती त्यावरून मुलांची शाळेबद्दलची आवड वाढत असल्याचे दिसून आले.[/read_more]

हर दिशा में ज्ञान मुळे झाले घरो घरी शिक्षणाचे वातावरण तयार(असोला)

सुषमा ,आदित्य ,कांचन

शिक्षणाचे योग्य वातावरण निर्माण करण्यासाठी राबवण्यात आलेल्या हर दिशा मै ज्ञान या प्रकल्पा मुळे प्रत्येक घरात पोस्टर लावून वाचनाची वातावरण तयार करण्यात आले ते तयार करत असताना मुलांना खूप मज्जा येत होती,  जसे सोबतच ते चित्र रंगवणे, खरडे (पुट्ठे) कापणे, चिकटवणे, कोणाच्या घरी किती लागले. .[read_more id=”1″ more=”Read more” less=”Read less”]

‘माझ्या घरी जास्त कि तुझ्या’ अशा गप्पा करणे, आवडलेला पोस्टर माझ्या घरी लागावा यासाठी हट्टी पणा करणे अशा काही छान छान गोष्टी घडताना दिसून येत आहेत.  मुलं पोस्टर ला घेऊन गप्पा करताना दिसतात. ते त्यांच्या हाताने तयार झालेले असल्याने त्यांना जवळचे वाटतात आणि ते आनंदाने वाचतात. त्यांना आता सांगायची गरज पडत नाही कि तू हेच वाच. म्हणून भिंतीवर लावलेले प्रत्येक पोस्टर ते स्वतंत्रपणे त्यांचे मन होईल तेव्हा वाचत असतात. मुलं आता स्वतःहून शिकण्यास मोकळे झाले आहेत असे दिसून येते.

सोबतच प्रत्येक घरामध्ये मोठया मुली आहेत, ज्या शिकत नाहीत. काहींचे नाव शाळेत असूनही शाळा दूर असल्याने जात नाहीत. घरीची कामे झाल्यावर त्यांच्याकडे काहीही कामे नसते. त्यांना जेव्हा पोस्टर बनवायचे आहे सांगितलं तेव्हा त्यांनी खूप उत्साहाने  यामध्ये मदत केली. त्यांचे बोलणे असते, “हम जब पढ़ते थे तब हमारे सर ने हमको ऐसा करने ही नहीं दिया कभी।” आता पण त्यांना पोस्टर color करायला खूप आवडते.

पोस्टर मध्ये वेगवेळे बालगीत, गाणी लिहले आणि त्या गाणी आणि बालगीत च्या related त्यामध्ये छान चित्रं काढलेली असतात. लहान मुलांना जरी वाचता नाही आले तरी ते चित्र बघून गाणी म्हणायला लागतात. त्यातील चित्र बघून मुलांना ते वाचायला आणखी आवडायला लागते.

पोस्टर च्या माद्यमातून शिकण्याची ही प्रक्रिया सगळ्यासाठी खूप आनंदाची आणि मज्जेदार ठरणारी आहे.[/read_more]

पालकांना मुलांच्या शिक्षणाविषयी केले जागृत(सोनखांब )

– निलेश ढोके

सुरवातीला दोन्ही वयोगातील मुलांना कस शिकवायचं याला घेऊन मला बरीच प्रश्न पडायची आणि त्या वर कसा मार्ग काढायचं या साठी  मला भरपूर विचार करावं लागत होता. प्राथमिक गटाची मुलं शाळेत जात होती तर पूर्व प्राथमिक गटाचा मुलांना मी बड्या वर शिकवत होतो. या मध्ये मला मुलांना रोज शाळेला सोडणे आणि त्याना शाळेतुन रोज घरी घेऊन येणे हा नित्यक्रम रोज चालायचा.या मध्ये माझी खूप तारांबळ व्हायची आणि मुलांना शाळेत सोडून आल्यावर मला खूप थाकायला व्हायचं आणि माझ्या पूर्व प्राथमिक गटाचा मुलं कडे दुलक्ष व्हायचं , ज्या वेळेत त्याचा वर्ग व्हायला हवा तो वेळ मुलांना देऊ शकत नव्हतो आणि मुलं छोटी असल्या मुळे ती लवकर घरी जायची जिद्द करायची..[read_more id=”1″ more=”Read more” less=”Read less”]

काही कालांतरानी मी पालकांशी या बद्दल चर्चा केली पण त्या वर पाहिजे तसा प्रतिसाद नाही मिळाला , ते मला सांगू लागले कि भैया हमारा नाही हो सक्ता, हमे बहुत काम है. हे उत्तर ऐकल्यावर  मी माझ्या मेंटॉर सोबत चर्चा केली आणि काय करू शकतो या वर चर्चा केली ठरल्या प्रमाणे मग मी काही दिवसांनी पालक सभा घायचा ठरवलं. काही दिवसांनी पालक सभा घेतली तेव्हा सर्व पालक एकत्र आली , त्या मध्ये येत असलेली आव्हान मी त्याचा पुढे मांडली. मला होत असलेला त्रास, मुलाचा होत असलेला नुकसान त्याचा लक्षात आणून दिला , तेव्हा सभेत भरपूर चर्चा झाल्या आणि सभेचा शेवटी सर्व पालकाचा लक्षात येताच त्यानी स्वतः मुलाना शाळेत घेऊन जाणे आणि परत आण्याची जबाबदारी घेतली. सभेत ठरल्या प्रमाणे प्रत्येक पालक हप्त्यातील प्रत्येकी २ २ दिवस आपली जबाबदारी पार पडतात आणि आता मी यायचं आधी मुले शाळेत जायला तयार असतात आणि पालक मुलांना वेळेचा आत शाळेत सोडतात. या मुळे आता पूर्व प्राथमिक गटाची वर्ग मी वेळेवर चालू करू शकतो आणि मुले शाळेत उत्साहाने बसतात.एक पालक सभेमुळे भरपूर बदल झाला, पालकांना त्याची जबादारी समजली आणि ती ते चोख पणे पार पडतात , शिक्षणाच महत्व आता  ते हळू हळू आता समजू लागले आहे. हा होणारा बद्दल पाहून खूप आनंद वाटतो.[/read_more]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *