समुदायात गुंजला शिक्षणाचा आवाज
समुदायात गुंजला शिक्षणाचा आवाज

समुदायात गुंजला शिक्षणाचा आवाज

कांचन देवळे , वर्षा खोल्ये

नेहमी भारवाड आणि पारधी समुदायातील मुलांचा एकत्र वर्ग घेतला जातो. पण अगोदरच्या दिवशी भारवाड समुदायातील एका ज्येष्ठ माणसाचे अचानक निधन झाले होते. दुसऱ्या दिवशी भारवाडची मुले वर्गात येणार की नाही हा प्रश्नचं होता. त्यामुळे कांचन आणि वर्षांने त्या दिवशीचा प्लॅन वेगळाच बनविला. भारवाड समुदायातील मुलांच्या घरी Home visit करायची, नंतर पारधी समुदायात एखाद्याच्या अंगणात मुलांना शिकवायचे, असे दोघींनीही ठरविले. आरती ही दुसऱ्या वर्गात आहे, तिच्या घराच्या अंगणात वर्ग घेण्याची पूर्ण तयारी झाली होती. हळूहळू नेहमी वर्गात येणारे मुले आले होते. 

क्लासची सुरुवात दोघींनीही कवितेपासून केली. मुलांचा कविता म्हणण्याचा आवाज आजूबाजूच्या घरी ऐकू जात होता. कविता म्हणून झाल्यानंतर मुले इंग्रजी विषयाचे वाचन करू लागले होते. इंग्रजी वाचनाचा आवाज ऐकून काही पालक घराच्या बाहेर आले आणि दुरूनच आपल्या मुलांना बघत होते. 

दुसऱ्या वर्गातील अंजली खूप दिवसापासून शाळेत येत नव्हती, परंतु त्या दिवशी आली. सोबतच तिचे बाबाही आले. ते अर्धा तास तिच्याजवळ बसले आणि ती काय शिकते ते बघत होते. कांचन ने अंजलीला सुरुवातीच्या दिवसांमध्ये शिकविलेले शब्द लिहायला लावले होते, ते शब्द तिला लिहताच आले नाही. पण मयुरीला ते पूर्ण शब्द बरोबर लिहिता आले. मयुरी ही अंजलीची मैत्रीण, ती नेहमी शाळेत येत होती. त्यामुळे तिचा लिहिण्याचा सराव चांगला झाला होता. अंजलीच्या बाबाने दोघींच्याही लर्निंग मधील फरक त्या दिवशी बघितला. अंजली काही दिवस वर्गात न आल्याने तिची थांबलेली प्रगती त्यांना दिसली. दररोज मुलीला वर्गात पाठवणे किती महत्त्वाचे आहे, हे त्यांना कळले होते. त्या दिवसापासून अंजलीचे बाबा दररोज तिला वर्गात पाठवू लागले.

घराच्या अंगणात भरलेल्या वर्गात अंजलीच्या बाबांसह इतर मुलांचे पालकही सहभागी होते. अशिक्षित असलेले पूर्ण  पालक आपल्या मुलांच्या अभ्यासाबद्दल  विचारणा करत होते. मुलाच्या अभ्यासाबद्दलची ओढ त्या दिवशी सगळ्या पालकांमध्ये  दिसत होती. मुले आणि पालकांसोबत भरलेल्या अंगणातील वर्गाचा आवाज त्या दिवशी  पूर्ण समुदायात गुंजत होता.

One comment

  1. अमित कुळ्ये,राहणार:-तालुका,रत्नागिरी, जिल्ह्या,रत्नागिरी

    खुप छान उपक्रम आहे,,पुढिल वाटचालीस खुप खुप शुभेच्छा वर्षा आणि तिचे सहकारी खुप चांगलं कार्य करत आहात

Leave a Reply

Your email address will not be published.