– डेविड सूर्यवंशी

आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास होता, कारण शाळेत पालकसभा आयोजित करण्यात आली होती. सर्व दीदींना त्यांच्या घरी जाऊन बोलावून घेतले. एकत्र आल्यानंतर वातावरण खूप आनंदी व उत्साहपूर्ण झाले होते. सुरुवातीला आम्ही दीदी लोकांना treasing च्या workheet दिल्या. आणि यात खूप वेगळी गोष्ट म्हणजे आम्ही या पालक सभेत त्यांच्या सही घेतल्या. त्या एकमेकांकडे पाहत सही करत होत्या. नंतर त्यांच्यासोबत एक अॅक्टिविटी घेतली त्यात त्यांना आकार च्या माध्यमातून भैय्यालोकांची चित्रे काढायची होती. खूप आनंदाने त्या या एकटीविटी मध्ये सहभागी झाल्या होत्या. आणि हा आनंद सहज त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
यानंतर मी आणि प्रगतीने सर्व दिदीला मुल वाचायला कशी शिकलेली आहे, आणि मुले आता इंग्लिश वाचायला शिकत आहे. लहान मुले हिंदीतील शब्द वाचत आहे. यासोबत माहीने सगळ्यांसमोर वाचून दाखविले. सगळ्यांनी मिळून माहीचे व बाकी मुलांचे कौतुक केले.
आम्ही त्यांना प्रश्न केला की, तुम्हाला मुलांमध्ये कोणते बदल होतांना दिसत आहे हे विचारल्यावर रेखा दीदी सांगत होत्या की, आमची मुले खूप चांगल्या प्रकारे शिकत आहे. प्रगती मॅडम आणि सर तुम्ही आल्यापासून मुलांमध्ये खूप बदल दिसू लागला आहे. आता मुले मन लावून शिकत आहेत आणि त्यांच्या सोबतच आम्हालाही शिकण्याची संधी मिळत आहे. अक्षर काय असत, शब्द कसे तयार होतात आणि वाचायचे कसे, हे शिकण्याची त्यांची खूप उत्सुकता दिसून येत होती.
काली दीदी म्हणाल्या की, घरची खूप कामे असतात. तरीही सगळी कामे पूर्ण करून आम्ही शिकण्यासाठी नक्की येऊ, कारण आता शिकण्याची गोडी लागली आहे. वाली दीदींच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. त्या म्हणाल्या की, आधी माहीला काहीच येत नव्हते. पण आता ती वाचायला शिकत आहे, हे पाहून खूप आनंद होतो.
मनिषा दीदींनीही आपले मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, त्यांच्या रिंकूने आता खूप चांगले वाचायला सुरुवात केली आहे. ती स्वतःची कामे पूर्ण करून शिकायला जाते, हे पाहून त्यांना अभिमान वाटतो.
आज सर्व दीदींनी स्वतःच्या हाताने आपले नाव लिहिले आणि सर्वांनी मिळून आपल्या पतीचे चित्र काढले. सगळ्यांना खूप मजा आली. अशा प्रकारे शिकण्यात खूप आनंद मिळतो, आणि वेळ मिळाला तर आम्ही नक्की येऊ, असे त्यांनी सांगितले. या संपूर्ण अनुभवातून एक गोष्ट स्पष्ट झाली की शिक्षण फक्त मुलांसाठी नसून संपूर्ण कुटुंबासाठी परिवर्तन घडवणारी शक्ती आहे. जेव्हा शिक्षक प्रेमाने शिकवतात आणि पालकही त्या प्रक्रियेत सहभागी होतात, तेव्हा शिकणे आणि शिकवणे आनंददायी बनते. आज प्रत्येकाच्या डोळ्यांत आशा होती, चेहऱ्यावर हसू होते आणि मनात पुढे आणखी शिकण्याची प्रेरणा होती. ही पालकसभा म्हणजे नव्या स्वप्नांची, आत्मविश्वासाची आणि उज्ज्वल भविष्यातील सुंदर सुरुवात हो