
मी प्रीतम नेहारे, मूळचा वर्धा जिल्ह्यातील आहे. माझे पदव्युत्तर शिक्षण MA (मास्टर ऑफ आर्ट्स) मध्ये पूर्ण झालेले आहे. सध्या मी Learning Companions Fellowship 2024-26 या समूहाचा फेलो आहे. मी सोनखांब सेंटरला सहा ते बारा वयोगटातील मुलांना शिकवतो तसेच सेंटरच्या इतर जबाबदाऱ्या सांभाळतो.
Learning Companions Fellowship मध्ये सहभागी होण्याआधी मी UPSC ची तयारी करत होतो आणि त्यासोबतच नोकरी शोधत होतो. कॉलेजच्या शेवटच्या सेमिस्टरमध्ये असताना Learning Companions Fellowship चा मेसेज व्हॉट्सअॅप ग्रुपवर आला. तो मेसेज नीट समजून घेतल्यावर मला भरवाड समुदायातील मुलांना शिकवायचं आहे हे कळलं. फार विचार न करता मी फॉर्म भरला. एका समुदायासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा म्हणून ही संधी निवडली, आणि काही महिन्यांच्या selection process नंतर माझी निवड झाली.
या काळात स्वतःमध्ये झालेला बदल मला स्पष्टपणे जाणवतो. मुलांना शिकवत त्यांना प्रगतिपथावर नेण्याचा आणि स्वतःला शिक्षक म्हणून घडवण्याचा आनंद मिळतो आहे. मुलांसोबत काम करताना समुदायाची संस्कृती, त्यांचे अनुभव आणि समस्या समजून घेण्याची संधी मिळाली. नवीन गोष्टी शिकणे, वाचन करणे आणि स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवणे इथे शक्य झाले.
फेलोशिपचा निर्णय घेताना घरची जबाबदारी आणि नोकरीचा विचार होता; मात्र आज तो निर्णय योग्य वाटतो. दोन वर्षांच्या प्रवासात मूल आणि समुदाय या दोन्ही स्तरांवर काम करताना communication, documentation आणि data handling ही कौशल्ये विकसित झाली. मुलांच्या शिक्षणात सकारात्मक बदल घडवणे, समुदायाच्या समस्या समजून घेणे व त्यावर काम करणे शिकता आले. तसेच English project च्या माध्यमातून स्वतः शिकण्याची व इतरांना शिकवण्याची संधी मिळाली.
मुलांना शिक्षणासाठी प्रेरित करणे, त्यांचा शैक्षणिक प्रवास सतत चालू राहावा आणि सुशिक्षित समाज घडावा ही माझी इच्छा आहे. Learning Companions Fellowship हे केवळ शिकवण्याचे नाही, तर स्वतः घडण्याचे एक प्रभावी व्यासपीठ आहे.
Learning Companions Fellowship 2026-28 ची निवड प्रक्रिया सुरु आहे.
अधिक माहितीसाठी खालील नोंदणी फॉर्म भरा.
https://forms.gle/TXu1BRXnMfU3fzg79