
मी मयुर सिकंदर गेडाम, मूळचा चंद्रपूर जिल्ह्यातील चिमढा या गावचा आहे. माझं पदवीधर शिक्षण BSW (Bachelor of Social Work) मध्ये पूर्ण झालं आहे. सध्या मी लर्निंग कंपॅनियन्स फेलोशिप 2025–27 cohort चा Fellow असून, लर्निंग कंपॅनियन्स फेलोशिपच्या ठणठण सेंटरमध्ये १० ते १५ वयोगटातील मुलांसोबत शिकवण्याचं काम करत आहे.
BSW पूर्ण झाल्यानंतर मला अशा संस्थेत काम करायचं होतं जिथे मला नवे अनुभव मिळतील, स्वतःला घडवता येईल आणि शिकण्याची संधी मिळेल. या शोधात मला लर्निंग कंपॅनियन्स फेलोशिप बद्दल माहिती मिळाली आणि मी अर्ज केला. निवड प्रक्रियेच्या दरम्यान मला सोनखांब बेडा येथे अनुभवासाठी पाठवण्यात आलं. त्या ठिकाणी सगळंच माझ्यासाठी नवीन होतं समाज, विद्यार्थी, लोकांचं राहणीमान आणि त्यांची संस्कृती. सुरुवातीला थोडी भीती आणि गोंधळ वाटला, पण हळूहळू या सगळ्या अनुभवांत मला आनंद दिसू लागला. मुलांसोबत वेळ घालवताना, त्यांचे वर्ग घेताना, sharing करताना एक वेगळंच समाधान मला मिळू लागला. या अनुभवामुळे मुलांशी जुडणं किती महत्त्वाचं आहे, हे मला समजलं.
निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मला ठणठण बेडा मिळाला. तिथे काम करताना नव्या अडचणी समोर आल्या. ठणठण बेड्यावर मुलींची संख्या जास्त असल्यामुळे सुरुवातीला त्यांच्याशी संवाद साधणं आणि विश्वास निर्माण करणं कठीण गेलं. मात्र संयम, सातत्य आणि संवाद यांच्या मदतीने हळूहळू मैत्री झाली आणि नातं मजबूत झालं.
सुरुवातीला माझे वर्ग नियमित नव्हते आणि वर्गाची मांडणीही नीट होत नव्हती. पण lesson plan वापरायला सुरुवात केल्यानंतर वर्ग अधिक नियोजनबद्ध झाले. मुलांना माझे वर्ग आवडू लागले आणि त्यांना शिकण्यात रस निर्माण झाला. आज मुलं लक्ष देऊन ऐकतात, प्रश्न विचारतात आणि सहभाग घेतात. लर्निंग कंपॅनियन्स फेलोशिप ही माझ्यासाठी खूप मोठी संधी आहे. इथे मी शिक्षक म्हणूनच नाही, तर व्यक्ती म्हणूनही घडत आहे. माझ्या अंगी असलेले गुण मला नव्याने कळत आहेत आणि त्यांचा उपयोग मी माझ्या वैयक्तिक जीवनातही करत आहे.
Learning Companions Fellowship 2026-28 ची निवड प्रक्रिया सुरू आहे.
अधिक माहितीसाठी खालील नोंदणी फॉर्म भरा.
https://forms.gle/TXu1BRXnMfU3fzg79