Fellow Story – Nikita Dewase
Fellow Story – Nikita Dewase

Fellow Story – Nikita Dewase

मी निकिता देवासे. मी मूळची वर्धा जिल्ह्यातील आहे. माझे शिक्षण B.Sc. पर्यंत झालेले आहे. मी Learning Companions Fellowship 2024-26 cohort ची फेलो आहे. सध्या मी असोला सेंटरमध्ये प्राथमिक गटातील मुलांना शिकवते. त्यासोबतच documentation associate म्हणून काम करते.

Graduation झाल्यानंतर कोणत्या क्षेत्रात शिक्षण घ्यावे, हे स्पष्ट नव्हते. त्या काळात मी घरीच 6 ते 12 वयोगटातील मुलांना शिकवत होते. WhatsApp group वरून मला Learning Companions Fellowship बद्दल माहिती मिळाली. मुलांना शिकवायची आवड असल्यामुळे मी fellowship साठी अर्ज केला. आधीपासूनच काही प्रमाणात शिक्षणाचा अनुभव असल्यामुळे दोन-तीन महिन्यांच्या निवड प्रक्रियेनंतर माझी निवड झाली आणि शिक्षण क्षेत्रातील माझा प्रवास सुरू झाला.

Fellowship जॉइन केल्यानंतर मी पहिल्यांदाच घराबाहेर पडले. सुरुवातीला हा प्रवास थोडा कठीण वाटत होता, पण नव्या कौशल्यांची आत्मसात होत असल्याची जाणीव होत गेली. मुलांना कसे शिकवावे, त्यांच्या वाढीच्या टप्प्यांनुसार शिकवण्याच्या आणि समजून घेण्याच्या नवीन पद्धती शिकत गेले. मुलांना शिकवत असताना मी स्वतःही खूप काही शिकत आहे. शिकणे आणि शिकवणे या दोन्ही गोष्टी इथे अनुभवायला मिळत आहेत. शिक्षण क्षेत्रातच पुढे काम करायचे आहे, याबाबत माझी खात्री वाढत आहे. Reflection च्या प्रक्रियेतून माझ्यात झालेला बदल स्पष्टपणे जाणवत आहे. माझा self-confidence वाढत आहे, तसेच माझे विचार मी समोरच्या व्यक्तीसमोर मांडू शकते.

दोन वर्षांच्या प्रवासात मूल आणि समुदाय या दोन्ही स्तरांवर काम करताना communication, documentation आणि data handling ही कौशल्ये विकसित झाली. English project च्या माध्यमातून स्वतः शिकण्याची व इतरांना शिकवण्याची संधी मिळाली. तसेच मी Internship चा vartical सांभाळत आहे, या दरम्यान मी स्वतःमध्ये leading, Ownership, Managing, team work यासारख्या qualities आत्मसात करत आहे.
वेगळ्या समुदायात शिक्षक म्हणून काम करताना मुलांसोबत पुन्हा बालपण जगण्याचा आनंद खूप सुखद आहे.
Learning Companions Fellowship 2025 निवड प्रक्रिया सुरू आहे.
अधिक माहितीसाठी खालील नोंदणी फॉर्म भरा:

https://forms.gle/TXu1BRXnMfU3fzg79

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *