
मी नविंता डोंगरे, मूळची नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील आहे. माझे पदव्युत्तर शिक्षण MSW (Master of Social Work) पर्यंत पूर्ण झाले आहे. सध्या मी 2025–26 ची Fellow असून, चक्रीघाट सेंटरमध्ये ६ ते १२ वयोगटातील मुलांना शिकवण्याचे काम करत आहे.
MSW करत असताना मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. मात्र त्यामध्ये मला अपेक्षित यश मिळत नव्हते. त्या काळात मी स्वतःशीच विचार करू लागले की आपल्याला नेमकं काय करायचं आहे. तेव्हा मला जाणवत होते की मला समुदायांमध्ये लीडर म्हणून काम करायचे आहे. मी मनाशी ठरवले होते की MSW पूर्ण झाल्यानंतर कम्युनिटीसोबत काम करायचे आहे. पण त्या टप्प्यावर मला मार्गदर्शन करणार कोणी नव्हते.
याच दरम्यान कॉलेजमधील एका सेमिनारमध्ये मला लर्निंग कंपॅनियन्स फेलोशिप बद्दल माहिती मिळाली. मी ते सेशन attend केले आणि लर्निंग कंपॅनियन्स फेलोशिप विषयी अधिक जाणून घेतली. त्यानंतर मी अर्ज केला आणि काही महिन्यांच्या निवड प्रक्रियेनंतर माझी लर्निंग कंपॅनियन्स फेलोशिपसाठी निवड झाली. नंतर झालेल्या एक महिन्याच्या प्रशिक्षणादरम्यान मला मुलांबरोबर काम करणे, कम्युनिटी समजून घेणे आणि शिक्षकाची भूमिका काय असते याबाबत महत्त्वाची समज मिळाली.
फेलोशिप जॉईन केल्यानंतर मी पहिल्यांदाच घराबाहेर पडले आणि भारवड समुदायाच्या मुलांना शिकवु लागले . माझ्या मनात एकच विचार होता मला स्वतःला सिद्ध करायचे आहे आणि नवनवीन गोष्टी आत्मसात करायच्या आहेत. पहिल्यांदाच एका नवीन कम्युनिटीत जाऊन मुलांना शिकवणे माझ्यासाठी सोपे नव्हते. सुरुवातीचा प्रवास खूप कठीण गेला. पण हळूहळू मला नव्या कौशल्यांची जाणीव होऊ लागली आणि ती कौशल्ये मी स्वतःमध्ये विकसित करू लागले.
प्रत्येक अडचणीचा सामना करत, माझे ध्येय डोळ्यासमोर ठेवून मी पुढे जात राहिले. मुलांना शिकवताना मी स्वतःही शिकत गेले. या प्रवासात माझा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. फेलोशिपच्या या काळात मी सतत शिकत आहे, स्वतःमध्ये नवीन skills build करत आहे आणि एक व्यक्ती म्हणून घडत आहे.
लर्निंग कंपॅनियन्स फेलोशिपमुळे मला माझ्या निर्णयावर ठाम राहण्याची आणि समुदायांसोबत अर्थपूर्ण काम करण्याची संधी मिळाली आहे.
Learning Companions Fellowship 2026-28 ची निवड प्रक्रिया सुरु आहे.
अधिक माहितीसाठी खालील नोंदणी फॉर्म भरा.
https://forms.gle/TXu1BRXnMfU3fzg79