
मी कोमल गौतम. मी नागपूर जिल्ह्यातील खेतापूर या गावाला राहते. माझे शिक्षण डी.एड. होऊन मी बी.कॉम अंतिम वर्षात शिकत आहे. मी Learning Companions Fellowship 2024-2026 cohort ची फेलो आहे. सध्या चक्रीघाट सेंटरला प्राथमिक गटातील मुलांना शिकवत आहे.
मी बारावी झाल्यावर डी.एड करत असताना गावाजवळील शाळेत लहान मुलांना शिकवायची. त्यांना शिकवत असताना तिथे खूप अडचणी येत होत्या कारण ती एक कॉन्व्हेंट शाळा होती. तिथे मुलांना शिकवण्याची पद्धत वेगळी होती आणि त्यांना कडक शिस्त लावली होती. आम्हाला सुद्धा तिथे मोकळेपणाने काम करणे शक्य नव्हते. मुलंही मोकळेपणाने शिकू शकत नव्हती. मी स्वतः काही शिकत आहे का, पुढे जात आहे का हे पाहू शकत नव्हते.
माझ्या गावचे जिल्हा परिषद शाळेतील दुलेवाले सर मला खूप सपोर्ट करायचे. त्यांनीच मला Learning Companions Fellowship बद्दल सांगितलं. मी त्याबद्दल पूर्ण माहिती शोधली आणि त्यात माझी आवड निर्माण झाली. मुलांना शिकवा आणि स्वतः सुद्धा शिकत राहा ही संकल्पना मला खूप आवडली. मात्र हे काम नागपुरात असल्यामुळे घरचे नाही म्हणतील अशी भीती होती. मी सरांशी याबद्दल बोलले, आणि सरांनी माझ्या घरी समजावलं. घरच्यांनी मला होकार दिला आणि फेलोशिप करण्याची परवानगी दिली. त्यानंतर मी Learning Companions Fellowship साठी अर्ज केला, आणि काही महिन्यांच्या निवड प्रक्रियेनंतर माझी निवड झाली.
निवड झाल्यानंतर मला इथे हळूहळू खूप नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत. PPT तयार करणे, प्रेझेंटेशन करणे, डॉक्युमेंटेशन करणे, Excel, स्टोरीटेलिंग, टीमवर्क यासारख्या स्किल्समध्ये मी सुधारणा होताना दिसत आहे.
यावर्षी Be The Change प्रोजेक्टद्वारे मी “बेडा स्थलांतर या विषयावर मी काही स्टोरीज लिहिल्या आणि त्यातील काही स्टोरीज पब्लिशही झाल्या आहेत. या कामातून माझी ऑब्झर्वेशन स्किल्समध्ये सुधारणा झाली आणि समुदायाशी बोलताना माझं कम्युनिकेशन अधिक चांगलं झालं. त्यामुळे मला पुन्हा आत्मविश्वास मिळाला आणि आता मी मुलांसाठी छोट्या छोट्या कथा लिहायला सुरुवात केली आहे.
Learning Companions Fellowship 2026-28 साठी निवड प्रक्रिया लवकरच सुरू होत आहे. आणि अनेक गोष्टी नव्यानं शिकत आहे.
अधिक माहितीसाठी खालील नोंदणी फॉर्म भरा: