Fellow Story – Diksha Shende
Fellow Story – Diksha Shende

Fellow Story – Diksha Shende

मी दिक्षा शेंडे. मी चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील नांदेड या गावातून आलेली आहे. माझे b.ed (bachelor of education) पर्यंत शिक्षण झाले आहे. मी सध्या लर्निंग कंपॅनियन्स फेलोशिप (2025 -26) या समूहातील fellow असून कल्पकता एज्युकेशनल फाउंडेशन, सीरसी येथे 6 ते 12 वयोगटातील मुलांसोबत काम करत आहे.

फेलोशिपमध्ये सहभागी होण्यापूर्वी मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. त्याच काळात माझे B.Ed. चे शिक्षणही सुरू होते. B.Ed. अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून मी इंटर्नशिप करत असताना शिकवण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. त्या काळात मुलांशी संवाद साधताना, त्यांना शिकवताना आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना मला एक वेगळाच आनंद मिळू लागला. याच अनुभवातून मुलांना शिकवण्याची खरी आवड माझ्या मनात निर्माण झाली.

एके दिवशी सोशल मीडियावर सहज स्क्रोल करत असताना मला लर्निंग कंपॅनियन्स फेलोशिप विषयी माहिती मिळाली. ही संधी पाहून मला खूप उत्सुकता वाटली. या फेलोशिपबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी मी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचली. फेलोशिपमधील कामाचे स्वरूप, मुलांसोबत प्रत्यक्ष काम करण्याची संधी आणि स्वतःला वैयक्तिक व व्यावसायिक पातळीवर घडवण्याची मिळणारी संधी समजल्यावर मला ही फेलोशिप माझ्यासाठी योग्य वाटली. त्यामुळे फारसा विचार न करता मी या फेलोशिपसाठी अर्ज केला.
त्यानंतर निवड प्रक्रिया सुमारे दोन ते तीन महिने चालली. प्रत्येक टप्पा माझ्यासाठी शिकण्याचा आणि स्वतःला तपासण्याचा अनुभव ठरला. अखेर जून महिन्यात माझी निवड झाली. तो क्षण माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि आत्मविश्वास देणारा होता.

आज या फेलोशिपच्या प्रवासाला सहा महिने पूर्ण झाले असून, आता मला स्पष्टपणे जाणवत आहे की लर्निंग कंपॅनियन्स फेलोशिप मध्ये सहभागी होण्याचा निर्णय हा माझ्या आयुष्यातील एक संस्मरणीय आणि महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. या प्रवासामुळे मला माझ्या क्षमतांची जाणीव झाली, सतत शिकत राहण्याची प्रेरणा मिळाली आणि शिक्षण क्षेत्रात स्वतःची वाट शोधण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
Learning Companions Fellowship 2026-28 ची निवड प्रक्रिया सुरु आहे.
अधिक माहितीसाठी खालील नोंदणी फॉर्म भरा.
https://forms.gle/TXu1BRXnMfU3fzg79

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *