
मी निखिल ढोक, मूळचा चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. माझे शिक्षण B.E. Computer Science and Engineering मध्ये झाले आहे. मी Learning Companions Fellowship 2024-26 cohort चा fellow आहे. मी इथे Recruitment Associate म्हणून काम करत आहे आणि त्यासोबतच प्राथमिक गटातील मुलांना शिकवण्याची संधी मला मिळत आहे.
इंजिनियरिंग झाल्यानंतर मी एका संस्थेशी जोडलो, जिथे गावातील समस्यांवर कार्य करत होतो. त्या काळात सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली आणि त्या कामात मन रमू लागले. पण कोरोनाकाळात ते काम बंद पडले. त्यानंतर मी एका कॉर्पोरेट ऑफिससाठी काम करू लागलो. मात्र, तिथले काम मनासारखे वाटत नव्हते. माझे मन सतत सामाजिक कार्याकडे ओढले जात होते आणि मी NGO शोधू लागलो.
तेव्हा मला सोशल मीडियाच्या माध्यमातून Learning Companions संस्थेबद्दल समजले. मी त्यांचे काम जाणून घेतले आणि ते मला खूप आवडले. त्यामुळे मी फेलोशिपसाठी अर्ज केला. ते म्हणतात ना, “If you desire something with true intensity, the entire universe conspires to help you achieve it.” माझ्याबाबतही असेच झाले! काही महिन्यांच्या निवड प्रक्रियेनंतर माझी या पदासाठी निवड झाली.
या कामात मला अनेक शाळा व महाविद्यालयांना भेटी द्यायची संधी मिळाली. संस्थेच्या कार्याविषयी माहिती देताना नवनवीन अनुभव येतात. वेगवेगळ्या स्वभावाचे लोक भेटतात आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळते. त्यामुळे खूप काही शिकायला मिळत आहे. या प्रवासात माझ्यात अनेक बदल झाले. कोणाशी कसे बोलावे, कसे वागावे हे शिकायला मिळाले. तसेच field वर काम करण्याचा अनुभवही घेतला. तेथील मुलांना शिकवताना मलाही खूप शिकायला मिळाले. जणू मी पुन्हा लहानपण अनुभवत आहे. या कामामुळे माझे मन आनंदी झाले आहे. मी अधिक मोकळा बोलू लागलो, स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखू लागलो. या कामात मला मजा येते आणि समाधान मिळते.
या प्रवासात मी Communication, Documentation, Data handling, यासारख्या skill शिकलो, तसेच मी Internship चा vartical सांभाळत आहे,या दरम्यान मी स्वतःमध्ये leading, Ownership, Managing, team work यासारख्या qualities आत्मसात करतो आहे.
Learning Companions Fellowship 2025 निवड प्रक्रिया सुरू आहे.
अधिक माहितीसाठी खालील नोंदणी फॉर्म भरा.
https://forms.gle/TXu1BRXnMfU3fzg79