
माझे नाव प्राची मुरलीधर बोरेकर आहे. मी वर्धा जिल्ह्यातील असून, माझे शिक्षण हिंगणघाट येथे पूर्ण झाले आहे. मी B.Sc. (CBZ) मध्ये Graduation पूर्ण केले आहे. सध्या मी आसोला बेड्यावर प्राथमिक आणि पूर्व-प्राथमिक गटातील मुलांसोबत शिकवण्याचे काम करत आहे.
Graduation च्या शेवटच्या वर्षात मी नागपूरमध्ये आले आणि जवळजवळ एक वर्ष दोन वेगवेगळ्या institute मध्ये Counsellor म्हणून काम केले. त्या कामातून अनुभव मिळाला, पण मनाला समाधान नव्हते. माझ्या दादानी आणि त्यांच्या मित्रानी मला लर्निंग कंपॅनियन्स फेलोशिप बद्दल सांगितले. आणि मुलांसोबत काम करण्याची संधी असल्यामुळे मी अर्ज केला.
सुमारे दोन ते तीन महिन्यांच्या निवड प्रक्रियेनंतर माझी निवड झाली. पहिल्यांदाच घराबाहेर राहून कम्युनिटीमध्ये काम करताना सुरुवातीला थोडा गोंधळ झाला, पण हळूहळू मुलांना शिकवण्याची पद्धत, वयानुसार त्यांना समजून घेणे आणि शिकवताना मजा निर्माण करणे या गोष्टी शिकायला मिळाल्या. मुलांसोबत काम करताना माझा आत्मविश्वास वाढला, माझी इंग्लिश improve झाली आणि documentation, presentation, communication यासारखी कौशल्ये आत्मसात केली. इथे मला समजले की शिक्षण म्हणजे फक्त अभ्यास नाही, तर नाते, मूल्ये आणि आनंद निर्माण करणे आहे.
आज मी जेव्हा मागे वळून पाहते, तेव्हा मला स्पष्टपणे जाणवते की लर्निंग कंपॅनियन्स फेलोशिप माझ्या आयुष्यातील एक टर्निंग पॉइंट ठरली आहे. इथे मला फक्त नोकरी नाही, तर शिकण्याची दिशा, जीवनमूल्ये आणि आत्मसमाधान मिळाले आहे.
लर्निंग कंपॅनियन्स फेलोशिपने मला केवळ शिक्षक म्हणून नव्हे, तर व्यक्ती म्हणूनही घडवण्याची संधी दिली. इथे मला स्वतःला शोधता आले, नविन स्किल्स शिकता आल्या आणि कामातून खरा आनंद अनुभवायला मिळाला. हा अनुभव माझ्यासाठी अत्यंत मूल्यवान आणि जीवन घडवणारा ठरला आहे.
Learning Companions Fellowship 2026-28 ची निवड प्रक्रिया सुरु आहे.
अधिक माहितीसाठी खालील नोंदणी फॉर्म भरा.
https://forms.gle/TXu1BRXnMfU3fzg79