Yes, फक्त २००० मित्र, वर्षातून फक्त एक वेळा!
इतकं सुंदर, मोलाचं काम करत असलेल्या आपल्या हिरोंसाठी महत्वाचं आहे की त्यांची स्वतःची काळजी घेण्यासाठी पुरेसे पैसे वेळेवर आणि सन्मानाने मिळावे. आणि लर्निंग कंपॅनिअन्सची ही गरज मोठी नाही. दरवर्षी, वर्षातून फक्त एकदा २००० मित्रांनी आपापल्या शक्तीप्रमाणे योगदान दिले तर लर्निंग कंपॅनिअन्स चा ३०-५०% वार्षिक निधी जमा होऊ शकतो आणि संस्थेला कायमचे स्थैर्य येऊ शकते.
आपण, आपल्या छोट्याश्या मदतीतून एका सुंदर, मोलाच्या कामाचे आधारस्तंभ बनू. लर्निंग कंपॅनिअन्स च्या या सुंदर गोष्टी आपल्या सर्वांच्या बनतील ज्या आपण अभिमानाने आपले मित्र, नातेवाईकांना सांगू.
साहस आणि तळमळीच्या गोष्टी – फेलो आणि समुदाय मुलांच्या शिक्षणासाठी कशा पद्धतीने काम करत आहेत याच्या गोष्टी इथे वाचा

लोक आम्हाला डोनेट का करतात? – याआधी लर्निंग कंपॅनिअन्स ला मदत केलेल्या मित्र/हितचिंतकांच्या प्रतिक्रिया इथे वाचा

बदल – मागील ७ वर्षाच्या दरम्यान लर्निंग कंपॅनिअन्सनी मुलांचे शिक्षण आणि आपल्या प्रदेशात चांगले नेतृत्व तयार व्हावे यासाठी केलेल्या कामाच्या प्रगतीबद्दल इथे वाचा

या चळवळीची ताकद बना – एकदा ही व्यवस्था बसली की ती खूप सोपी आणि मजबूत असेल. पण आत्ता या क्षणाला त्यासाठी सर्व शक्ती एकवटून सुरुवात करावी लागणार आहे. आणि हे एकट्याने नाही होऊ शकणार आहे. लर्निंग कंपॅनिअन्स ला या क्षणाला तुमची गरज आहे.
एक स्पेसिफिक विनंती:
- तुम्ही स्वतः शक्य असल्यास वर्षातून एकदा मदतीची ही commitment द्या आणि डोनेट करा
- तुमच्याच सारखा स्वभाव असणाऱ्या आणि तुमच्यावर विश्वास, प्रेम असणाऱ्या ५ मित्रांशी बोला (Specially असे लोक जे already सामाजिक कामात नाहीत आणि त्यांच्यासाठी ही एक चांगल्या कामाला जोडून घेण्याची संधी असेल)
- त्यांना लर्निंग कंपॅनिअन्स च्या दोन गोष्टी सांगा (अगदी ४-६ ओळीत पटकन कळतील आणि भावतील अशा ८-१० गोष्टी इथे भेटतील).
- आणि मग त्यांना हे सांगा, “हे माझं काम आहे, आणि तू याला सपोर्ट करावं असं वाटतं. तुला जमेल ती मदत, मी फक्त वर्षातून एकदा मागेन”