लर्निंग कंपॅनिअन्स – कोहोर्ट २०२३-२५
लर्निंग कंपॅनिअन्स – कोहोर्ट २०२३-२५

लर्निंग कंपॅनिअन्स – कोहोर्ट २०२३-२५

पाचव्या कोहोर्टपर्यंत टीमच्या क्षमता विकास, नियोजन आणि सपोर्टमध्ये हळूहळू predictability आली आणि कामाला स्थिरता मिळाली. त्यानंतर अधिक स्पष्ट, structured आणि focused, outcome-driven planning ने काम सुरू केलं. आतापर्यंत fellows फिल्डवर टिकून राहणं हा सर्वात मोठा प्राधान्यक्रम होता. ते साध्य झाल्यावर मुलांच्या learning outcomes वर अधिक नियोजनबद्ध आणि आग्रहीपणे काम सुरू केलं.

या वर्षी पहिल्यांदाच भरवाड समूहातील मुलांमधील साक्षरता 42% पर्यंत पोहोचली. हा फक्त आकडा नव्हता—तो उद्देशपूर्ण आणि सातत्यपूर्ण कामाचा पुरावा होता. पहिल्यांदाच literacy वर खोल आणि परिणामकारक पद्धतीने काम करता आलं.

या प्रवासात लोकांनीच ही स्थिरता “जिवंत” ठेवली.

प्रतीक्षा जिथे असे, तिथे मुलांसाठी सकारात्मक आणि सुरक्षित शैक्षणिक वातावरण तयार होत असे. तिचा friendly स्वभाव, सहज संवाद आणि “जुळवून घेणं महत्त्वाचं” हा विश्वास—यामुळे बेड्यावर असो किंवा कम्युनिटीमध्ये, ती पटकन नातं जोडायची. मुलं गोंधळ घालत असली तरी ती वैतागत नसे. lesson plan वर ठाम राहत ती म्हणायची, “माझ्याकडून 100% प्रयत्न झाले; मुलांनी त्यातलं अर्धं जरी घेतलं, तरी ते पुरेसं आहे.” ही भूमिका टीमला टिकवून ठेवणारी ठरली.

पल्लवी ने technical गोष्टी आणि practical निर्णय शांतपणे हाताळले. प्रवासाचे नियोजन, जुगाड आणि अनोळखी शहरामध्येही survive करण्याची तिची क्षमता अनेक वेळा उपयोगी पडली. सुषमा मुलांशी पटकन connect होत प्रेमळ संवाद साधायची, गाणी घ्यायची आणि प्रत्येक कामात “learning” शोधायची. कुठल्याही परिस्थितीत काम करण्याची तयारी, संयम आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा स्वभाव—यामुळे ती मुलांसोबतच टीममध्येही चांगलं collaboration करू शकली.

आदित्य चा शांत आणि संयमी स्वभाव, तसेच काम सुरू करण्याआधी प्रत्येक गोष्ट note down करून planning करणं—यामुळे स्पष्टता आणि शिस्त टिकून राहिली. कामाबाहेरही तो तितकाच simple होता—जेवण बनवताना गप्पा मारणं, मित्रांसोबत वेळ घालवणं त्याला आवडायचं. जनक स्वतःला घडवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिली. मुलांना अजून काय नवीन देता येईल याचा विचार, शिकून experiment करून पाहणं आणि growth mindset—यामुळे मुलांमध्ये शिकण्याची उत्सुकता आणि आत्मविश्वास वाढत राहिला.

याच काळात 2024 मध्ये रियाझघर प्रकल्प सुरू झाला—पहिल्यांदाच रियाझघरचा दोन महिन्यांचा प्रदीर्घ निवासी प्रयोग झाला. ती फक्त activity नव्हती; तर आमच्या vision, planning आणि execution ची परीक्षा होती. या बॅचने दाखवून दिलं की people systems मजबूत असतील, focus स्पष्ट असेल आणि learning वर ठाम उभं राहिलो, तर results येतातच; आणि ते टिकूनही राहतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *