लर्निंग कंपॅनिअन्स – कोहोर्ट २०२२ -२४
लर्निंग कंपॅनिअन्स – कोहोर्ट २०२२ -२४

लर्निंग कंपॅनिअन्स – कोहोर्ट २०२२ -२४

तिसऱ्या कोहोर्ट साठी सुरुवातीला निवड झालेल्या 9 पैकी 7 लोक पहिल्या १-२ महिन्यातच drop out झाले होते. तिथून एकच वर्षांनी आलेल्या ४थ्या कोहोर्ट च्या 11 पैकी 9 fellows नी दोन वर्षांचा प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला. हा फक्त आकडा नव्हता तर तो टीम म्हणून उभं राहण्याचा, आव्हानांमधून शिकून मजबूत झाल्याचा पुरावा होता.

निधी आणि निशांत यांनी challenging परिस्थितीतही एक पूर्ण project टिकवून ठेवला. निशांतकडे अनेक गोष्टी एकाच वेळी सांभाळण्याची ताकद होती: प्राथमिक मुलांसोबत English, FLN concepts आणि activities; pre-primary मध्ये gross motor, fine motor development; monthly assessment papers—सोबतच doctors समन्वय (health camp), विद्यार्थ्यांचे daily meals, program logistics आणि मुलांचं health; आणि centre साठी bills, खरेदी, voucher books अशी administrationही. निधीने lesson planning, मुलांसोबत delivery, centre मधील documentation आणि इतर कामं वेळेत—अनेकदा वेळेपलीकडे जाऊन—जिद्दीने पूर्ण केली.

प्रगतीने अनेकांना emotional support दिला, संवादातून सकारात्मक दृष्टिकोन मजबूत केला. प्रारुपचा प्रेमळ आणि honest स्वभाव यामुळे सर्वजण त्याच्यावर पटकन विश्वास टाकतात. पायलची सतत शिकण्याची भूक, community सोबत काम करताना जाणीवपूर्वक विकसित केलेला patience, आणि इतरांचं ऐकून घेण्याची सवय—यामुळे काम अधिक संवेदनशील झालं. कुणी overwhelm झालं, भावुक झालं तर त्यांना व्यक्त होण्यासाठी जागा करून दिली. प्रशांतचा शांत, स्थिर वावर यामुळे आजूबाजूच्या सर्वांना सुरक्षिततेचा अनुभव यायचा; बोलण्यापेक्षा ऐकणं, आणि संवादातून clarity आणणं हे त्याचं महत्वाचं contribution.

फील्डवर निलेशचा मुलांशी आणि community सोबतचा bond, त्याची creativity आणि हलकंफुलकं वातावरण निर्माण करण्याची क्षमता—यामुळे शिकणं मुलांसाठी आनंददायी झालं. अंजलीने मुलांच्या भावना समजून, त्यांना priority देऊन, वाचलेल्या गोष्टी class मध्ये implement करण्याचं धाडस दाखवलं; judgment न ठेवता पार्श्वभूमी समजून घेण्याची तिची पद्धत मुलांना आणि community ला पटकन जोडून घेणारी होती. कांचन ने सकारात्मक मानसिकता, सतत शिकण्याची वृत्ती, शिस्त आणि कारण समजून मग प्रतिक्रिया देण्याची सवय या गोष्टी आपल्या कृतीतून टीम ला दिल्या.

खूप strong आंतरिक सुरक्षितता आणि सहजतेमुळे जान्हवी आपल्या अवतीभोवतीच्या माणसांना, मुलांना खूप सहजतेने आणि भरभरून प्रेम देऊ शकणारी जान्हवी. याच कारणाने बेड्यावर फेलो म्हणून कामाचा अनुभव नसताना आणि अशा प्रकारच्या आयुष्यापासून खूप दूर असतानाही जान्हवी समूहासोबत इतकी मिसळली की आज तिला भरवाड समुहापासून वेगळं imagine सुद्धा करता येत नाही. 

या सगळ्या छोट्या-छोट्या क्षणांनी एकत्रितपणे हा विश्वास दिला की योग्य पद्धतीने शिकत राहिलो, काळजीपूर्वक implement केलं, आणि टीम म्हणून साथ दिली, तर परिणाम येतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *