तिसऱ्या कोहोर्टची सगळ्यात खास गोष्ट अशी की—भरवाड कम्युनिटीमध्ये पहिल्यांदाच “स्केल”वर, एकाच वेळी चार–पाच सेंटर्सवर काम सुरू झालं. तो काळ म्हणजे नवीन स्ट्रक्चर, दूर-दूरच्या फिल्ड्स, रोज नवे प्रश्न—आणि खरं सांगायचं तर आपणच अजून शोधत होतो की हे नेमकं चालणार “कसं”.
त्या वर्षी सगळ्यात जास्त प्रयोग झाले; तितकंच शिकायला मिळालं; आणि अनेक अडचणी समोर आल्या. पण ह्याच learning मधून खूप clarity येत गेली—एका nomadic community सोबत काम करताना काय “काम करतं”, काय नाही, आणि आपण कसं काम करायला हवं. ही clarity या बॅचने फेलोशिपच्या केंद्रस्थानी आणली—आणि पुढच्या प्रवासाला दिशा दिली.
अगदी नवा प्रयोग आणि भरपूर अडचणी यामुळे बरेच जण प्रवास सुरू ठेवू शकले नाहीत. अशा वेळी शेवटी उरलेल्या ३-४ जणांनीही असाच फेलोशिप सोडण्याचा निर्णय घेतला असता तर फेलोशिप थांबली असती. एक-दोन वर्षांनी परत सुरुवात करावी लागली असती. सगळ्यात मोठं नुकसान म्हणजे नुकतीच कामाला आलेली लय तुटली असती. पण विक्रांत, अस्मिता, कल्याणी, वर्षा आणि मोनाली सर्व अडचणी स्वीकारून थांबले. आणि म्हणूनच तो प्रवाह पुढे वाहत राहिला; आणि आपण 2025–26 पर्यंतचा प्रवास सातत्याने करू शकलो.
या टीममध्ये प्रत्येकाची भूमिका वेगळी होती, पण एकाच ध्येयाशी जोडलेली. विक्रांतचा संयमी आणि शांत approach, टीमसोबतचा सहकार्यशील स्वभाव, आणि नातं—यामुळे आपलेपणा आणि मैत्री खोलवर रुजली. अस्मिताचे संवाद कौशल्य, खास करून मुली-बायकांसोबत—periods, pregnancy सारख्या संवेदनशील विषयांवर सहज संवाद—यामुळे समुदायासोबत विश्वासाचे नाते निर्माण झाले. शिकवताना उपयोगी पडेल ते ऑनलाइन शिकणं, पुस्तकं वाचणं, ठामपणे मत मांडणं—यातून सर्वांच्याच अनुभवाला धार मिळाली. मोनालीसाठी मुलं हे core होतं: भरपूर वाचन, courses, आणि जे शिकली ते ground वर प्रामाणिकपणे implement करणं; मुलांना आत्मविश्वास देणं; आणि एका बेड्यापुरतं न थांबता गावातही काही वेगळं करता येईल का हे पाहणं—या वृत्तीने कामाला गती दिली. कल्याणीची भरपूर शिकण्याची ओढ आणि creativity—नवनवीन गोष्टी करून पाहण्याची ताकद बनली. वर्षाचा धाडसी स्वभाव—चुकीला “चुकीच” म्हणणं, बरोबर गोष्टींसाठी stand घेणं; पारधी आणि भरवाड यांना जवळ आणण्याचा प्रयत्न, सोयी-सुविधांसाठी धडपड—याने काम केवळ शिक्षणापुरतं मर्यादित न राहता, अधिक मानवी आणि व्यापक बनलं. आणि या सर्वांना जोडणारी, जिथे धडपडतील तिथे बोलून, धीर देऊन चालत राहण्याची ऊर्जा देणारी ऐश्वर्या. स्वतः शिक्षक म्हणून असलेली प्रगल्भ समज आणि कल्पकता यामुळे ऐश्वर्या सर्वांना सातत्याने वर्गाची गुणवत्ता उंचावण्यासाठी दृष्टी आणि प्रेरणा देऊ शकली.
तिसऱ्या कोहोर्टचं योगदान “फक्त काम” नव्हतं—तर कठीण काळात उभं राहणं, टिकवणं, आणि लर्निंग कंपनियन्सची जर्नी तुटू न देणं. या पाच जणांच्या resilience मुळेच आपण हा प्रवास manage, sustain आणि पुढे grow करू शकलो.