
मी प्रगती बांडेबुचे, मूळची भंडारा जिल्ह्यातील रोहा गावाची आहे. माझं पदव्युत्तर शिक्षण M.A. (History) या विषयात पूर्ण झालं आहे. सध्या मी लर्निंग कंपॅनियन्स फेलोशिप 2025–2027 कोहोर्ट ची Fellow असून, ठणठण सेंटरमध्ये प्राथमिक गटातील मुलांना शिकवण्याचं काम करत आहे.
माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही काळ मी स्पर्धा परीक्षांच्या तयारीत गुंतले होते. त्याच काळात मला लर्निंग कंपॅनियन्स फेलोशिप विषयी माहिती मिळाली. अधिक स्पष्टता मिळवण्यासाठी मी वेबसाईटवर उपलब्ध असलेली सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचली. त्या माहितीचा विचार करूनच मी Fellowship साठी अर्ज करण्याचा निर्णय घेतला.
लर्निंग कंपॅनियन्स फेलोशिप मध्ये आल्यावर मला शिक्षणाचा खरा अर्थ समजायला लागला. शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकांपुरतं मर्यादित नसून, मुलांना समजून घेऊन, त्यांच्या पातळीवर जाऊन शिकवणं किती महत्त्वाचं आहे. मला लहानपणापासूनच शिकताना मजा आली पाहिजे असं वाटायचं, आणि तसंच शिक्षण मला लर्निंग कंपॅनियन्स फेलोशिप मध्ये अनुभवायला मिळालं. इथे शिक्षण हे मजेशीर activity-based आणि प्रोजेक्टच्या माध्यमातून दिलं जातं. त्यामुळे मुलं वर्गात मनापासून सहभागी होतात आणि त्यांचं learning अधिक प्रभावीपणे घडतं.
मुलांना शिकवताना मलाही खूप काही शिकायला मिळालं. या संपूर्ण प्रवासात मला स्वतःबद्दल अनेक reflections मिळाले, जे माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक growth साठी खूप महत्त्वाचे ठरले आहेत. इथे मी एक शिक्षिका म्हणून अनेक नवीन कौशल्ये आत्मसात केली आहेत.
पूर्वी मी फार कमी लोकांमध्ये राहत होते आणि मला लोकांसोबत बोलायची खूप भीती वाटायची. पण Fellowship च्या प्रवासात मी लोकांसोबत मिसळायला शिकले आहे. माझ्या communication skills मध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. Team work, presentation, documentation आणि English communication यासारखी अनेक कौशल्ये मी इथे आत्मसात करत आहे. यामुळे माझा आत्मविश्वास खूप वाढला आहे. पूर्वी समोरच्या व्यक्तीशी बोलताना मला भीती वाटायची, पण आज मी माझं मत आत्मविश्वासाने आणि स्पष्टपणे मांडू शकते.
लर्निंग कंपॅनियन्स फेलोशिप मुळे मी केवळ एक शिक्षिका म्हणूनच नव्हे, तर एक आत्मविश्वासू, सजग आणि जबाबदार व्यक्ती म्हणूनही घडत आहे.
Learning Companions Fellowship 2026-28 ची निवड प्रक्रिया सुरु आहे.
अधिक माहितीसाठी खालील नोंदणी फॉर्म भरा.
https://forms.gle/TXu1BRXnMfU3fzg79