Fellow Story – Pallavi Shambharkar
Fellow Story – Pallavi Shambharkar

Fellow Story – Pallavi Shambharkar

मी पल्लवी शंभरकर, मूळची वर्धा जिल्ह्यातील आहे. माझे पदव्युत्तर शिक्षण MSW (मास्टर ऑफ सोशल वर्क) मध्ये झालेले आहे. सध्या मी Learning Companions Fellowship 2024-26 cohort ची फेलो आहे. ठणठण या सेंटरमध्ये सहा ते बारा वयोगटातील मुलांना शिकवते.

MSW पूर्ण केल्यानंतर मी वेगवेगळ्या प्रकल्पांवर काम केले. महिलांसोबत तसेच मुलांसोबत कामाचा अनुभव घेतला. मात्र, प्रकल्प संपल्यानंतर काही काळ घरीच राहावे लागले. मी अशा कामाच्या शोधात होते ज्यामध्ये मला आनंद मिळेल आणि माझा खरा रस असेल. सोशल मीडियावर Learning Companions Fellowship बद्दल माहिती मिळाली. त्यामधील खेळ व प्रकल्पांच्या माध्यमातून शिक्षण देण्याची पद्धत मला फार आकर्षक वाटली. या आधी LFE च्या मुलांसोबतच्या प्रकल्पाचा अनुभव असल्याने मला या कामाशी जोडल्यासारखे वाटले आणि मी या फेलोशिपसाठी अर्ज केला. दोन ते तीन महिने निवड प्रक्रिया सुरू होती, आणि शेवटी माझी निवड झाली.

सुरुवातीला बेड्यावर काम करणे खूप आव्हानात्मक वाटले. नवीन समुदायासोबत जुळवून घेणे, त्यांना समजून घेणे आणि मुलांसोबत मैत्री करणे यामध्ये अडचणी आल्या. मात्र, त्या अडचणींवर मात करत मी इथे स्थिर झाले. आता मागे पाहते तेव्हा माझ्या व्यक्तिमत्त्वातील बदल जाणवतो. मुलांना आपुलकीने जवळ घेणे, समुदायातील कार्यक्रमात सहभाग घेणे आणि स्वतःमधील कौशल्यांचा विकास करणे यात प्रगती केली आहे.

फेलोशिप सोडण्याचा विचार अनेकदा मनात आला, पण मुलांची आठवण आणि त्यांचा आत्मविश्वास मला ऊर्जा देत गेला. काम करताना आव्हानात्मक परिस्थितीत हताश होते, पण माघार न घेता काम पूर्ण करणे आणि त्यातून मिळणारा आनंद अमूल्य होता. या दोन वर्षाच्या प्रवासात माझ्यातील भीती दूर झाली आणि आत्मविश्वास वाढला आहे. याचे उदाहरण म्हणजे जेव्हा मुलांना शाळेत घेत नव्हते तेव्हा केंद्रप्रमुखांशी बोलून मोठ्या मुलांना शाळेत पाठवण्यास यशस्वी झाले.
या प्रवासात मी रोज काहीतरी नवीन शिकत आहे. जसे की, प्रेझेंटेशन देणे, डॉक्युमेंटेशन करणे, टीम वर्क, पुस्तक वाचन, स्टोरीटेलिंग आणि वेळेचे नियोजन यांसारख्या अनेक गोष्टी मी येथे आत्मसात केल्या आहेत.

Learning Companions Fellowship 2026-28 ची निवड प्रक्रिया सुरु आहे.
अधिक माहितीसाठी खालील नोंदणी फॉर्म भरा.

https://forms.gle/TXu1BRXnMfU3fzg79

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *