Fellow Story – Rohini Kalbhut
Fellow Story – Rohini Kalbhut

Fellow Story – Rohini Kalbhut

मी रोहिणी कालभूत आहे. मी वर्धा जिल्ह्यातील असून माझं शिक्षण B.Sc. Biotechnology पर्यंत पूर्ण झालं आहे. सध्या मी लर्निंग कंपॅनियन्स फेलोशिप (2025–2027 cohort) ची Fellow म्हणून काम करत असून बोथली सेंटरमध्ये प्राथमिक गटातील मुलांसोबत शिकवण्याचं कार्य करत आहे.

Graduation पूर्ण केल्यानंतर माझ्या करिअरविषयी माझ्या मनात अनेक प्रश्न होते. पुढे कोणत्या क्षेत्रात जायचं, आपली खरी आवड कुठे आहे याबाबत स्पष्टता नव्हती. मात्र शिक्षण पद्धतीत बदल घडावा, शिक्षण क्षेत्रात प्रत्यक्ष काम करावं आणि शिक्षण पद्धती समजून घ्याव्यात अशी माझी इच्छा होती. विशेषतः मुलांना शिकवण्याच्या नव-नवीन पद्धती शिकून त्या प्रत्यक्षात वापरून पाहायच्या होत्या.

अशाच संभ्रमाच्या काळात WhatsApp group च्या माध्यमातून मला लर्निंग कंपॅनियन्स फेलोशिप बद्दल माहिती मिळाली. सुमारे दोन ते तीन महिन्यांच्या निवड प्रक्रियेनंतर माझी निवड झाली आणि त्याच क्षणापासून माझा शिक्षण क्षेत्रातील प्रवास सुरू झाला.

लर्निंग कंपॅनियन्स फेलोशिप जॉइन केल्यानंतर मला घरापासून दूर राहून काम करावं लागलं. सुरुवातीला नवीन ठिकाण, नवीन लोक आणि नवीन जबाबदाऱ्या यामुळे हा अनुभव थोडा कठीण वाटत होता. एकटीने प्रवास करणं, नवीन लोकांशी जुळवून घेणं, मुलांशी बोलणं आणि कम्युनिटीत मिसळायला थोडा वेळ लागला. मात्र हळूहळू मला या सगळ्याची सवय झाली.

मुलांना शिकवताना मी नव्या शिक्षण पद्धती शिकत आहे. प्रत्येक दिवस एक नवा अनुभव देणारा ठरत आहे. या प्रक्रियेत माझ्यातील कौशल्ये विकसित होत आहेत आणि माझा आत्मविश्वास वाढत आहे. Reflection च्या माध्यमातून माझ्यात होत असलेले बदल मला जाणवत आहेत. आता मी माझे विचार अधिक स्पष्टपणे मांडू शकते. Problem solving, communication आणि स्वतःला जुळवून घेणं यासारखी अनेक कौशल्ये मी या प्रवासात शिकले आहे.

 लर्निंग कंपॅनियन्स फेलोशिप मुळे शिक्षण क्षेत्रातच पुढे काम करायचं आहे याबाबत मला स्पष्टता मिळत आहे. पुढील काळात pre-primary आणि primary शिक्षण पद्धती अधिक सखोलपणे जाणून घेऊन त्यावर काम करण्याची माझी इच्छा आहे. एका वेगळ्या कम्युनिटीत शिक्षक म्हणून काम करताना मुलांसोबत पुन्हा एकदा बालपण अनुभवण्याची संधी मला मिळत आहे. हा प्रवास माझ्यासाठी शिकवणारा, समाधान देणारा आणि आयुष्याला नवी दिशा देणारा ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *