Fellow Story – Minanath Dadmal
Fellow Story – Minanath Dadmal

Fellow Story – Minanath Dadmal

मी मिननाथ अशोक दडमल, मूळचा चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तहसील मधील खेमजई गावचा आहे. माझं शिक्षण नागपूर येथे MSW (समाजकार्य – Social Work field) मध्ये पूर्ण झालं आहे. सध्या मी लर्निंग कंपॅनियन्स फेलोशिप अंतर्गत असोला बेड्यावर प्राथमिक गटातील मुलांना शिकवण्याचं काम करत आहे.

Post graduation झाल्यानंतर मी काही वर्षे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. समाजकार्य क्षेत्रात शिक्षण झालं असतानाही त्या टप्प्यावर मला समाधान वाटत नव्हतं. मला जाणवत होतं की मला समाजकार्याच्या फील्डशी जोडून, थेट लोकांमध्ये जाऊन काहीतरी अर्थपूर्ण काम करायचं आहे. मात्र योग्य दिशा आणि संधी शोधत असताना थोडा गोंधळही होता. याच दरम्यान माझ्या मित्रांकडून मला लर्निंग कंपॅनियन्स फेलोशिप बद्दल माहिती मिळाली. मी या फेलोशिपबद्दल अधिक जाणून घेतलं आणि अर्ज करण्याचा निर्णय घेतला. आज मागे वळून पाहताना मला वाटतं की हा निर्णय माझ्यासाठी खूप योग्य ठरला आहे. 

लर्निंग कंपॅनियन्स फेलोशिपला जॉईन केल्यानंतर मला अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. या प्रवासात माझ्यात खूप बदल झालेला मी स्वतः अनुभवत आहे. मला माझ्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळत आहे. लहान मुलांसोबत राहून, त्यांच्यासोबत शिकत-खेळत मला माझं लहानपण पुन्हा जगता येत आहे. शिक्षण म्हणजे नेमकं काय आणि ते आनंददायी कसं बनवायचं, हे मला इथे प्रत्यक्ष अनुभवातून शिकायला मिळत आहे.

कम्युनिटीसोबत जोडून काम करताना त्यांच्या भाषा, संस्कृती, पोशाख आणि जीवनशैली याबाबत नवी समज तयार होत आहे. फेलोशिप मध्ये येण्याआधी मी फारसा लोकांशी संवाद साधत नव्हतो, पण आता लोकांशी बोलणं, त्यांचं ऐकून घेणं आणि त्यांच्याशी नातं निर्माण करणं ही माझी सवय बनली आहे. ऑफिसपासून ते बेड्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी मला काही ना काही नवीन शिकायला मिळतं. काम करताना मनापासून आनंद मिळतो. इथे मला केवळ शिक्षक म्हणूनच नाही, तर माझ्या भविष्यासाठी आणि करिअरसाठीही documentation, presentation, communication आणि इतर आवश्यक skills शिकायला मिळत आहेत. लर्निंग कंपॅनियन्स फेलोशिप मुळे मी आनंददायी शिक्षणाच्या प्रवासाचा एक भाग बनलो आहे आणि एक व्यक्ती म्हणूनही सतत घडत आहे.

Learning Companions Fellowship 2026-28 ची निवड प्रक्रिया सुरु आहे. 

अधिक माहितीसाठी खालील नोंदणी फॉर्म भरा. 

https://forms.gle/TXu1BRXnMfU3fzg79

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *