सातव्या कोहोर्ट पर्यंत आपल्यात एक ठाम विश्वास तयार झाला होता की आपण मोठी स्वप्नं पाहू शकतो आणि ती एकामागोमाग एक साध्यही करू शकतो. कधी कधी फक्त थोडासा “पुश” दिला की टीम त्या पातळीपर्यंत पोहोचते, हे या टप्प्यावर स्पष्टपणे जाणवू लागलं.
याच बॅचमध्ये आपण पहिल्यांदाच मुलांसाठी English Learning देण्याचा ठाम निर्णय घेतला. इंग्लिशच्या बाबतीत आपण खऱ्या अर्थाने outcome-driven झालो—फक्त शिकवणं नाही, तर नेमका काय बदल दिसतोय हे मोजणं, त्यासाठी नियोजन करणं आणि शिकवण्याची पद्धत सातत्याने सुधारत राहणं. या प्रक्रियेत फेलोज आणि प्रोग्राम टीम स्वतःही English Learning मध्ये सक्रियपणे सहभागी झाले. त्यामुळे “आपणही शिकतोय” ही भावना मुलांपर्यंत पोहोचली.
या काळात प्रोग्राम टीमने स्वतंत्र जबाबदाऱ्या स्वीकारायला सुरुवात केली. इंग्लिश प्रोजेक्ट एका टीमने पूर्णपणे सांभाळणं, Riyaaz Ghar च्या जागेचं प्रत्यक्ष काम पुढे नेणं, Abhivyakti सारख्या उपक्रमांची अंमलबजावणी आणि fundraising ची जबाबदारी घेणं—ही सगळी कामं प्रोजेक्ट-ड्रिव्हन पद्धतीने पुढे जाऊ लागली. यातून एक महत्त्वाची गोष्ट विकसित झाली: प्रत्येक गोष्ट स्वतंत्रपणे अंमलात आणण्याची क्षमता—फक्त कामाची नाही, तर नेतृत्व, जबाबदारी आणि परस्परविश्वासाची.
या टीम-प्रवासात व्यक्तींचे छोटे-मोठे क्षण निर्णायक ठरले. प्राचीची प्रभावी संवादकला—समोरच्या व्यक्तीच्या भावना आणि गरजा समजून घेणं, थकूनही काम पूर्ण करणं, आणि नाटकाच्या प्रॅक्टिसमधला तिचा शिस्तबद्ध चिकाटीचा स्वभाव—याने इतरांना देखील उत्साह येतो. मिनानाथने वर्गात मुलांना शांतपणे हाताळत, कोणतीही चिडचिड न करता, “तक्रार न करता काम करून दाखवणं” ही संस्कृती रुजवली.
जीवनकडे मोठ्या मुलांचे वर्ग सांभाळण्याचं आव्हान नेहमीच अधिक होतं. कधी वर्ग नीट न चालला तरी तो मार्ग शोधत राहिला. मुलांना घरून बोलवायला जाणं, सकाळपासून संध्याकाळी ७–७.३० पर्यंत इतर कामं (cowfood, गायींचं लोकेशन) करूनही परत येऊन वर्ग घेणं, आणि मुलांसोबत खेळ-अॅक्टिव्हिटीद्वारे नातं टिकवणं—हे सातत्य टीमसाठी महत्त्वाचं ठरलं. मयूरने विविध अॅक्टिव्हिटीमधून सहज शिकवणं जमवत मुलांचा सहभाग वाढवला.
प्रगतीच्या प्रवासात दिसलेला बदलही या बॅचचा केंद्रबिंदू ठरला—समुदायात दीदींशी संवाद साधणं, त्यांच्या घरी आत्मीयतेने जाणं, मुलांसोबत घट्ट bond निर्माण करणं, स्वतः निर्णय घेऊन वर्ग सांभाळणं, आणि सततच्या प्रवासातही उत्साह टिकवणं. डेविडची मदतीस तत्पर आणि मैत्रीपूर्ण उपस्थिती—मुलांमध्ये care आणि safety ची भावना निर्माण करणारी—आणि नविंताची लहान मुलांशी सकारात्मक संवादकला, शिकताना बारकाईने समजून घेऊन नियोजन करणं आणि मुद्देसूद बोलणं—यांनी टीमचा पाया मजबूत केला. रोहिणीचा कठीण परिस्थितीत न अडकता त्वरित निर्णय घेण्याचा गुण अनेक कामांना गती देणारा ठरला.