२०१८ मध्ये विशाल, मीना, निहाल, देवयानी आणि प्रियंका यांच्यासोबत Learning Companions चा प्रवास सुरू झाला—हीच आमची पहिली, Founding Batch. त्या काळात काहीच ठरलेलं नव्हतं; सगळं “घडत” होतं. पण याच अनिश्चिततेत त्यांनी दाखवलेला विश्वास आणि सातत्य यामुळे नवनवीन designs तयार होत गेले, अर्थपूर्ण sessions उभे राहिले, नवीन ideas आणि strategies आकार घेत गेल्या. हा learning journey आम्ही त्यांच्यासोबतच करून पाहिला—अनुभवला, चुका केल्या, शिकत गेलो—आणि मग त्याच learning पुढे लागू करत Learning Companions चं पुढचं structure तयार होत गेलं. या प्रक्रियेत “जे मिळेल ते मनापासून स्वीकारून पूर्ण प्रयत्नांनी करायचं” या सर्वांच्या तयारीनेच कार्यक्रमाच्या पायाभरणीला मदत झाली.
विशाल मनापासून, प्रामाणिकपणे काम करणारा; बदल स्वीकारणारा आणि सतत शिकणारा—तो सर्वांना सोबत घेऊन चालला, इतरांच्या विचारांना आदर देत “आपलेपणा” आणि जबाबदारीची भावना वाढवत गेला. मुलांशी त्याचं प्रेमळ, विश्वासाचं नातं आणि त्याचा सकारात्मक स्वभाव यामुळे वर्गात सुरक्षित आणि आनंदी वातावरण तयार राहिलं—ज्याने टीमला स्थिरता आणि आत्मविश्वास दिला. निहाल सर्व प्रक्रियेत विनम्रतेने आणि उत्साहाने सहभागी होणारा. मीना ची शिकण्याची ओढ आणि मुलांना समजून घेऊन त्यांना सहभागी करून घेण्याची पद्धत यामुळे sessions अधिक जिवंत, सहभागी आणि अर्थपूर्ण झाले; तिच्या कामाने “मुलांकेंद्रित” दृष्टिकोन टीमच्या सवयीचा भाग झाला. देवयानीच्या कामातील professionalism आणि वेग यामुळे इतरांना देखील जास्त कार्यक्षमतेने आणि वेगाने काम करण्याची प्रेरणा मिळायची. प्रियंका चं classroom planning, वर्गानंतर रोजचा reflection, आणि नीटनेटकी documentation— कोहोर्ट मधील सर्वांना चांगल्या वर्गाच्या तयारीसाठी push मिळायचा. सर्वांच्या पूरक ताकदींमुळे—नातेसंबंध, facilitation, आणि structure—एक नव्या संस्थेची सुरुवात “कार्यक्रम” न राहता “संस्कृती” बनत गेली; आणि याच सामूहिक ताकदीमुळे आपल्याला हा ठाम confidence मिळाला की ही जर्नी पुढेही सातत्याने, शिकत-शिकत, मजबूतपणे पुढे नेता येईल.