
माझं नाव जीवनदास चंपत ढोक आहे. मी मूळचा चंद्रपूर जिल्ह्यातील सालोरी गावचा रहिवासी आहे. मी BSW पदवीचं शिक्षण चिमूर येथून पूर्ण केलं. आणि त्यानंतर नागपूर येथील आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क या कॉलेज मधून MSW (मास्टर्स) पूर्ण केलं. सध्या मी लर्निंग कंपॅनियन्स फेलोशिप (2025–27 cohort) चा फेलो असून असोला सेंटरवर १० ते १७ वयोगटातील मुलांना शिकवतो. त्यासोबतच मी Cow Feed या Project वर काम करत आहे.
MSW चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मला सोशल वर्क या क्षेत्रात प्रत्यक्ष कामाचा अनुभव घ्यायचा होता. त्यामुळे मी Education Initiative या संस्थेत दोन महिने काम केलं. या काळात मला मुलांसोबत काम करण्याची आवड निर्माण झाली. गावामध्ये मी लहान मुलांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज शिकवत होतो आणि ते करताना मला खूप आनंद वाटायचा. Education Initiative मधील काम पूर्ण झाल्यानंतर मी लर्निंग कंपॅनियन्स फेलोशिपसाठी अर्ज केला.
निवड प्रक्रियेदरम्यान मला सोनखांब बेडा इथे अनुभवासाठी पाठवण्यात आलं. या कम्युनिटीची जीवनशैली आणि राहणीमान माझ्यासाठी पूर्णपणे नवीन होतं. तिथे मला मुलांसोबत संवाद साधताना आपुलकी दिसून आली आणि भेदभाव जाणवला नाही. हे पाहून मला या कम्युनिटीसोबत काम करण्याची इच्छा निर्माण झाली.
जेव्हा माझी निवड झाली, तेव्हा मला असोला (गवळीटोला) बेडा मिळाला. इथे आल्यानंतर माझी मुलांसोबत छान मैत्री झाली, गप्पा सुरू झाल्या आणि हळूहळू कम्युनिटीसोबत संवाद वाढत गेला. शिक्षक या नात्याने मुलांशी आणि कम्युनिटीसोबत एक सुंदर नातं तयार झालं.
सुरुवातीला मुलांसोबत वर्ग घेणं मला कठीण जात होतं. मंदिरासमोरच्या मोकळ्या जागेत वर्ग भरवत असताना अनेक अनुभव मिळाले. लेसन प्लॅनच्या मदतीने वर्ग घ्यायला सुरुवात केल्यानंतर मीही शिकत गेलो आणि मुलंही शिकू लागली, त्यामुळे स्वतःमध्ये बदल आणि वाढ जाणवू लागली.
त्यासोबतच मला Cow Feed Project मधूनही खूप चांगले अनुभव मिळाले. अनेक धान्य व्यापारांशी चर्चा करण्याची संधी मिळाली. पशु आहार कंपन्यांच्या प्रतिनिधींशी प्रत्यक्ष भेटीच्या माध्यमातून संवाद साधता आला. पशु आहाराचे प्रकार, तो कसा तयार केला जातो आणि कोणकोणत्या घटकांपासून बनतो या सर्व गोष्टी शिकायला मिळाल्या.
लर्निंग कंपॅनियन्स फेलोशिपच्या माध्यमातून अनेक नवीन अनुभव मिळत आहेत, आणि या प्रवासामुळे माझं शिकणं अधिक अर्थपूर्ण होत आहे.
Learning Companions Fellowship 2026-28 ची निवड प्रक्रिया सुरु आहे.
अधिक माहितीसाठी खालील नोंदणी फॉर्म भरा.
https://forms.gle/TXu1BRXnMfU3fzg79