Fellow Story – Devid Suryawanshi
Fellow Story – Devid Suryawanshi

Fellow Story – Devid Suryawanshi

मी डेविड सूर्यवंशी, मूळचा भंडारा जिल्ह्यातील आहे. माझं पदव्युत्तर शिक्षण B.S.W. (Bachelor of Social Work) मध्ये पूर्ण झालं आहे. सध्या मी Learning Companions Fellowship मध्ये Fellow म्हणून काम करत असून, ठणठण सेंटरमध्ये ३ ते ६ वयोगटातील पूर्व-प्राथमिक मुलांसोबत शिकवण्याचं काम करत आहे। 

B.S.W. करत असताना मी एका किराणा दुकानात काम करत होतो. सकाळी कॉलेज आणि दुपारी ते रात्री १० वाजेपर्यंत दुकान असं रोजचं आयुष्य होतं. या काळात मी मेहनत, शिस्त, वेळेचं नियोजन आणि जबाबदारी स्वीकारणं शिकलो. जवळपास पाच वर्षं दुकानात काम केल्यानंतर मला जाणवलं की मला केवळ उपजीविकेसाठी नव्हे, तर अर्थपूर्ण काम करायचं आहे. त्याच दरम्यान मी ‘निर्माण कॅम्प’ मध्ये सहभागी झालो. या कॅम्पमुळे माझी आवड, क्षमता आणि आयुष्याचा उद्देश स्पष्ट झाला. शिक्षणाच्या माध्यमातून समाजात बदल घडवणं हेच माझं काम असावं, याची ठाम जाणीव मला तिथे झाली.

यानंतर मी नागपूरला आलो आणि Learning Companions Fellowship साठी अर्ज केला. निवड प्रक्रियेतील सर्व राऊंड्स पूर्ण करून एक महिन्याचं प्रशिक्षण घेतलं. त्या वेळी माझी निवड झाली नाही, पण त्या प्रशिक्षणामुळे मुलांकडे पाहण्याची दृष्टी, शिकवण्याची पद्धत आणि reflection करण्याची सवय लागली. यामुळे शिक्षण क्षेत्रात काम करण्याचा माझा निर्णय अधिक पक्का झाला.

दोन वर्षानंतर Learning Companions Fellowship साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली. योग्य मार्गदर्शन आणि pre-work पूर्ण करून मी पुन्हा सर्व राऊंड्स क्लिअर केले आणि यावेळी Fellowship साठी माझी निवड झाली.

आज Fellowship दरम्यान मी पूर्व-प्राथमिक वयोगटातील मुलांसोबत काम करत आहे. या वयोगटात संयम, निरीक्षण आणि संवेदनशीलता किती महत्त्वाची आहे हे मी रोज शिकतो. मुलांना समजून घेणं, त्यांच्या गरजांनुसार शिकवणं आणि कम्युनिटीसोबत विश्वासाचं नातं निर्माण करणं या सगळ्या गोष्टींमध्ये माझ्यामध्ये सातत्याने वाढत आहे.

मी जे काम करत आहे, त्याचा अभिमान माझ्या आई-वडिलांना वाटतो, ही माझ्यासाठी मोठी प्रेरणा आहे. Learning Companions Fellowship ने मला शिकण्यासाठी, स्वतःला घडवण्यासाठी आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी दिलेली  ही संधी दिली आहे.

Learning Companions Fellowship 2026 की चयन प्रक्रिया जारी है. 

आज ही apply करें!

पंजीकरण फॉर्म: https://forms.gle/TXu1BRXnMfU3fzg79

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *